फडणवीस साहेब, लंडनला निघालेला माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय, विशाखा सुभेदार यांनी हंबरडा फोडला, मदतीसाठी याचना

मुंबई तक

Vishaka Subhedar : अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा देखील कुवैतमध्ये अडकला आहे. मुलाला भारतात परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. फेसबुकवर त्यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केलाय. 

ADVERTISEMENT

Vishaka Subhedar
Vishaka Subhedar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस साहेब, लंडनच्या प्रवासाला निघालेला माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय,

point

विशाखा सुभेदार यांनी हंबरडा फोडला

Vishaka Subhedar : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक नागरिक विदेशात अडकले आहेत. अनेक जण सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मायदेशी परत येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदत मागताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा देखील कुवैतमध्ये अडकला आहे. मुलाला भारतात परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. फेसबुकवर त्यांनी याबाबतचा व्हिडीओ शेअर केलाय. 

विशाखा सुभेदार म्हणाल्या, नमस्कार मी विशाखा सुभेदार.. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र, कुवैतमध्ये त्याचं फ्लाईटमध्ये उतरवण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून तिथं एअर स्पेस नसल्यामुळे विमाने रद्द करण्यात आली आहेत. माझा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकलाय. आता तेथील परिस्थिती गंभीर होत चाललीये. तिथे ड्रोन हल्ले होत आहेत. त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. भारतीयांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आमच्या मुलांची काळजी घ्यावी, ही विनंती सरकारला करत आहे. लवकरात लवकर मार्ग काढावा. 


दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणने त्यांचा प्रमुख नेता गमावलाय. त्यानंतर इराणने  ड्रोनच्या मदतीने आखाती भागातील अनेक देशांवर तसेच अमेरिकन तळांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे.. त्यामुळे Israel, United States, Saudi Arabia, United Arab Emirates, Kuwait, Bahrain यांसारख्या देशांमधील परिस्थिती हायअलर्टवर आहे. हे ड्रोन बहुतांश वेळा रात्री येतात आणि हवाई संरक्षण व्यवस्थेला चकवा देत हल्ला करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

हे वाचलं का?

    follow whatsapp