अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् नंतर केली विक्री, शेवटी मुलीचा करुण अंत; हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

Crime News : एखाद्या सिनेमासारखी वाटावी अशी घटना समोर आलीये. दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेताना पोलिसांच्या हाती अत्यंत हृदयद्रावक माहिती लागली आहे. ज्या प्रियकरासोबत ही मुलगी घर सोडून पळाली होती, त्यानेच तिचा विश्वासघात केला आणि त्यानंतर सुरू झालेला तिचा संघर्षाचा प्रवास मृत्यूने संपला. मुलीसोबत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् नंतर केली विक्री

point

शेवटी मुलीचा करुण अंत

point

हादरवून टाकणारं प्रकरण

Crime News : एखाद्या सिनेमासारखी वाटावी अशी घटना समोर आलीये. दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेताना पोलिसांच्या हाती अत्यंत हृदयद्रावक माहिती लागली आहे. ज्या प्रियकरासोबत ही मुलगी घर सोडून पळाली होती, त्यानेच तिचा विश्वासघात केला आणि त्यानंतर सुरू झालेला तिचा संघर्षाचा प्रवास मृत्यूने संपला. पोलिसांनी जेव्हा तिच्या शेवटच्या पत्त्यावर धाव घेतली, तेव्हा काही दिवसांपूर्वीच बाळंतपणादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दोन वर्षे सतत शोध घेणाऱ्या पोलिसांच्या हाती जिवंत मुलीऐवजी केवळ तिच्या मृत्यूची बातमी लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन

प्रेयसीला मित्राच्या हवाली केले

घटनेची पार्श्वभूमी अशी की, 2 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशातील प्रेमनगरमध्ये राहणारी ही मुलगी शेजारी राहणाऱ्या रामफेर नावाच्या तरुणासोबत घरातून पळून गेली होती. रामफेरने तिला मोबाईल दिला होता आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाला वडिलांनी विरोध केल्यामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही मध्य प्रदेशातील इंदोरला पोहोचले खरे, पण तिथे पोहोचल्यावर रामफेरचा खरा चेहरा समोर आला. त्याने स्वतः लग्न करण्याऐवजी त्या मुलीला आपला मित्र खेमचंद उर्फ खेमू याच्या हवाली केले. खेमचंदनेही तिच्याशी लग्न न करता अनेक महिने तिला सोबत ठेवले, मात्र काही महिन्यांपूर्वीच आजारपणामुळे खेमचंदचा मृत्यू झाला.

प्रसुतीनंतर शेवट

खेमचंदच्या मृत्यूनंतर ही मुलगी इंदोरमध्ये पूर्णपणे एकटी पडली. उदरनिर्वाहासाठी तिने प्लास्टिकचे जग बनवणाऱ्या एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तिथेच तिची ओळख राजकुमार नावाच्या तरुणाशी झाली. राजकुमारने तिला आपल्या गावी नेले आणि मंदिरात तिच्याशी लग्न केले. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला, मात्र दुर्दैवाने प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे तिचा जीव गेला. पोलीस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियतीने तिचा शेवट केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp