पालघरमध्ये मोठी दुर्घटना, विषारी वायू गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट; 2600 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन
Palghar Gas Leak : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या भगेरिया केमिकल कंपनीत 'ओलियम' या घातक वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्लॉट क्रमांक D-17 मध्ये स्थित असलेल्या या कंपनीत अचानक लागलेल्या आगीनंतर ही वायूगळती सुरु झाली. या वायू गळतीचे स्वरुप इतके भाषण होते की, कंपनीपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांत जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पालघरमध्ये मोठी दुर्घटना
विषारी वायू गळतीमुळे घबराट
2600 लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन
Palghar Gas Leak, मोहम्मद हुसैन खान : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या भगेरिया केमिकल कंपनीत 'ओलियम' या घातक वायूची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्लॉट क्रमांक D-17 मध्ये स्थित असलेल्या या कंपनीत अचानक लागलेल्या आगीनंतर ही वायूगळती सुरु झाली. या वायू गळतीचे स्वरुप इतके भाषण होते की, कंपनीपासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांत जळजळ, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. वायूगळतीमुळे हवेत धुराचे लोट पसरले असून स्थानिक रहिवासी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा : 'त्या' 2 रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील तर नरेंद्र मोदी यांनी खुर्ची खाली करावी, प्रकाश आंबेडकरांच्या ट्वीटने खळबळ
सर्वत्र धुराचे साम्राज्य
वायूगळतीची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. तारापूर विद्यामंदिर या शाळेतील 1600 विद्यार्थ्यांना तातडीने रेस्क्यू करण्यात आले, तर 1 हजारहून अधिक कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच भगेरिया कंपनीच्या परिसरातील इतर कारखान्यांमधील कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून हा परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच, कंपनीपासून काही अंतरावर असलेल्या एमआयडीसी निवासी वसाहतीमधील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. वायूगळतीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली असून लोकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे.
जीवितहानीचे वृत्त नाही
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.










