पुणे : इस्रो सायंटिस्ट असल्याचे सांगून लग्नाचे आमिष, आयटी इंजिनियर तरुणीकडून 42 लाख लुबाडले, आरोपी गोव्यात करायचा चैनी

ओमकार वाबळे

Pune Crime News : पुणे येथील वाकड परिसरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल 42.64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे खोटे सांगून तिचा विश्वास संपादन केला

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : इस्रोचा सायंटिस्ट असल्याचे सांगून लग्नाचे आमिष

point

आयटी इंजिनियर तरुणीकडून 42 लाख लुबाडले

point

गोव्यात करायचा चैनी

Pune Crime News : पुणे येथील वाकड परिसरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल 42.64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे खोटे सांगून तिचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून आणि भविष्यात एकत्र मालमत्ता खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने या तरुणीला आर्थिक जाळ्यात ओढले.

हे ही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात

42.64 लाख रुपये खात्यावर वळवले

मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पीडित तरुणी हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये तिची ओळख मॅट्रिमोनियल वेबसाईटवर जयेश पाटील नावाच्या व्यक्तीशी झाली. या आरोपीने आपण शास्त्रज्ञ असल्याचे भासवून तरुणीला लग्नाची मागणी घातली. इतकेच नव्हे तर, त्याने वाकड येथे येऊन तिची भेटही घेतली, ज्यामुळे तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत त्याने विविध कारणांसाठी महिलेकडून तब्बल 42.64 लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले.

सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने ऑनलाईन तक्रार नोंदवली. वाकड पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपीच्या खात्यावरील 16.65 लाख रुपये गोठवून ते हस्तगत केले आहेत, तर उर्वरित 27 लाख रुपयांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीची खरी ओळख जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे (निवासी अलिबाग, रायगड) अशी पटली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणे आणि त्या पैशातून गोव्यातील कॅसिनोमध्ये चैनीचे आयुष्य जगणे हा त्याचा छंद होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp