'लवकर ये आणि मला वाचव..' बहिणीचा भावाला फोन, भाऊ मदतीला गेला अन् दाजीने कात्रीने भोसकून केली हत्या

मुंबई तक

Crime News : नवरा मारहाण करत असताना एका महिलेने आपल्या भावाला फोन केला. बहिणीची आर्त हाक ऐकून तो भाऊ आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी गेला. मात्र मेहुण्याने कात्रीने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. विशाल (23) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'लवकर ये आणि मला वाचव..' बहिणीचा भावाला फोन

point

भाऊ मदतीला गेला अन् दाजीने कात्रीने भोसकून केली हत्या

Crime News : नवरा मारहाण करत असताना एका महिलेने आपल्या भावाला फोन केला. बहिणीची आर्त हाक ऐकून तो भाऊ आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी गेला. मात्र मेहुण्याने कात्रीने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. विशाल (23) असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील ही घटना आहे. 

हे ही वाचा : महाराष्ट्रातील 'त्या' खुनाचा अडीच वर्षांनंतर उलगडा; बॉडी जंगलात पुरली, DNA चाचणीवरुन तपास, दोघांना अटक

'लवकर ये आणि मला वाचव'

मृत विशालची बहीण टीना हिचा सोमवारी संध्याकाळी तिच्या पतीसोबत वाद झाला होता. टीनाने घाबरून आपल्या भावाला फोन केला आणि 'लवकर ये आणि मला वाचव' अशी विनवणी केली. बहिणीचे भीतीदायक बोलणे ऐकताच विशाल तातडीने तिच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर विशाल आणि त्याचा मेहुणा राहुल ऊर्फ अर्जुन सिंह यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

कात्रीने भोसकले

या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात राहुलने घरातून कात्री आणून विशालवर सपासप वार केले. विशालच्या छातीवर, पोटावर आणि कमरेवर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, पोलिसांपासून प्रकरण लपवण्यासाठी आरोपी आणि नातेवाईक विशालचा मृतदेह एका टेम्पोमध्ये घालून परस्पर अंत्यसंस्कार करण्यासाठी निघाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp