नवऱ्याने बायकोचा अश्लील फोटोसह फोन नंबर सोशल मीडियावर केला शेअर, तिचा सौदा करत...

मुंबई तक

Crime News : नवऱ्याने आपल्याच बायकोचा अश्लील फोटो आणि फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला, नंतर तिचा सौदा केला. यानंतर तिला अनेक फोन येऊ लागले. या त्रासाला कंटाळून पीडितेनं आपले माहेर गाठलं. याचा मोठा मानसिक आघात तिच्या मनावर झाला होता. यामुळे नवरा आणि बायकोच्या नात्यात मोठं अंतर निर्माण झालं होतं. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

Crime News : नवऱ्याने आपल्याच बायकोचा अश्लील फोटो आणि फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला, नंतर तिचा सौदा केला. यानंतर तिला अनेक फोन येऊ लागले. या त्रासाला कंटाळून पीडितेनं आपले माहेर गाठलं. याचा मोठा मानसिक आघात तिच्या मनावर झाला होता. यामुळे नवरा आणि बायकोच्या नात्यात मोठं अंतर निर्माण झालं होतं. 

हे ही वाचा : प्रेयसी म्हणाली, 'तुला खोट्या प्रकरणात अडकवेन, 10 लाख रुपये दे..' पुरुषानं विष पिऊन उचललं टोकाचं पाऊल

महिलेला हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी केली पैशांची मागणी

पीडितेचं काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता, तिचा पती हा रेल्वे अधिकारी म्हणून कार्यरत होता. महिलेच्या विवाहानंतर तिला सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी मिळवण्यासाठी तिचा छळ सुरु केला. तिला दररोज अपमानित केले जात होते. एक दिवस पीडितेला एका बंद खोलीत चमच्याने चटके देण्यात आले होते. ती कंटाळून माहेरी गेली होती.

आरोपी नवऱ्याने बायकोचे अश्लील व्हिडिओसह फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला

माहेरी आल्यानंतर तिचा नवरा अधिक विचित्र वागू लागला होता. आरोपीने पीडितेचं चारित्र्य हनन करण्यासाठी सोशल मीडियावर तिचा अश्लील व्हिडिओ आणि मोबाईल नंबर शेअर केला. तसेच त्या फोटोवर अश्लील आणि घाणेरडे कॅप्शन लिहिण्यात आले होते. यानंतर पीडितेला अनेकांचे फोन येऊ लागले होते.

हे ही वाचा : नवरा हुंड्यासाठी बायकोला मारायचा, नंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून... लाज आणणारा प्रकार

दरम्यान, पीडितेनं एसएसपी कार्यालयात जाऊन घटनेचा घटनाक्रम सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनेची विस्तृत माहिती देण्यात आली. लिसांनी आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि छळवणूकीचा तपास सुरू केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp