बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात 'बिल्डर लॉबी'चा संबंध नाही, मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलं प्रतिज्ञापत्र
Baba Siddique Murder Case : शहझीन सिद्दीकी यांनी पोलीस यंत्रणेवर केलेले सर्व आरोप तथ्यहीन असून, केवळ तपास अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी हे दावे केले जात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमधील वजनदार बिल्डरांची चौकशी जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोपही पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात 'बिल्डर लॉबी'चा संबंध नाही
मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलं प्रतिज्ञापत्र
Baba Siddique Murder Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा पुराव्यांच्या आधारावर करण्यात आलेल्या तपासाची माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली आहे. या गुन्ह्यात कथित 'बिल्डर लॉबी'चा कोणताही संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले नसल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. या संदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप केवळ संशय आणि तर्क-वितर्कावर आधारित असल्याचे नमूद करत, पोलिसांनी बिल्डर लॉबीच्या सहभागाचा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे.
वांद्रे येथे 12 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या या हत्येचा मुख्य उद्देश अनमोल बिश्नोई टोळीने स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि खंडणी वसुलीसाठी दहशत निर्माण करणे हाच होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना पोलिसांनी ही माहिती दिली. शहझीन यांनी आपल्या याचिकेत पोलिसांचा तपास 'अपूर्ण आणि दिशाभूल करणारा' असल्याचा दावा करत, काही बड्या बिल्डरांच्या चौकशीची मागणी केली होती.
हेही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात
शहझीन सिद्दीकी यांनी पोलीस यंत्रणेवर केलेले सर्व आरोप तथ्यहीन असून, केवळ तपास अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी हे दावे केले जात असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमधील वजनदार बिल्डरांची चौकशी जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोपही पोलिसांनी फेटाळून लावला आहे. तपासादरम्यान कोणत्याही बिल्डरचा या हत्येशी थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.










