12 वीत शिकणाऱ्या तरुणीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल केले; शेवटी, झोपलेल्या अवस्थेत डोक्यात गोळी घालून तिला संपवलं!

मुंबई तक

बोर्डाच्या परीक्षेच्या काळात 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची गावातीलच एका तरुणाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने पीडितेवर गोळी झाडून तिची हत्या केली.

ADVERTISEMENT

डोक्यात गोळी घालून तरुणीला संपवलं!
डोक्यात गोळी घालून तरुणीला संपवलं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

12 वीत शिकणाऱ्या तरुणीचे प्रायव्हेट फोटो व्हायरल केले

point

शेवटी, झोपलेल्या अवस्थेत डोक्यात गोळी घालून तिला संपवलं!

Crime News: बोर्डाच्या परीक्षेच्या काळात 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची गावातीलच एका तरुणाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना सोमवारी (2 मार्च) रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली असून आरोपी तरुणाने पीडितेवर गोळी झाडून तिची हत्या केली. आरोपी तरुणाविरुद्ध यापूर्वी सुद्धा तरुणीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पीडितेच्या डोक्यात गोळी घालून हत्या 

वृत्तानुसार, सोमवारी रात्री जवळपास 1 वाजताच्या सुमारास पीडिता घरात व्हरांड्यात झोपली असताना गावातीलच रहिवासी असलेला मंदीप नावाचा तरुण पिस्तूल घेऊन आला आणि त्याने झोपलेल्या अवस्थेत पीडितेच्या डोक्यात आणि छातीत गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य आणि तरुणीचा भाऊ जागा झाल्यानंतर आरोपीने त्यांना देखील बंदुकीचा धाक दाखवल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, आरोपी तरुणाने पीडितेच्या आईवर देखील गोळी झाडली पण सुदैवाने तिचा जीव वाचू शकला. कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील स्थानिक घटनास्थळी गोळा झाले मात्र, तिथून आरोपीने पळ काढला. पोलिसांनी गंभीररित्या जखमी असलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे राजयोग... वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणानंतर 'या' राशीच्या लोकांचं नशीब चमकणार!

पोलिसांनी दिली माहिती 

मृत तरुणीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंदीपने काही काळापूर्वी पीडितेशी मैत्री केली. त्या दरम्यान तरुणाने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. त्यानंतर, तरुणीच्या खाजगी फोटोंच्या आधारे आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. काही दिवसांनंतर, त्याने पीडितेचे ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर, तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये आयटी अॅक्ट आणि बलात्कार संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तरुण फरार होता. 

हे ही वाचा: महाराष्ट्रातील 'त्या' खुनाचा अडीच वर्षांनंतर उलगडा; बॉडी जंगलात पुरली, DNA चाचणीवरुन तपास, दोघांना अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी शाळेत हुशार विद्यार्थिनी होती आणि ती तिच्या 12 वी बोर्डाची परीक्षा देत होती. घटनास्थळी तिची पुस्तके सुद्धा दिसून आली. पीडिता 12 वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन चांगलं यश मिळवेल, अशी तिच्या कुटुंबियांना आशा होती पण या घटनेने तरुणीचं आयुष्य उद्धवस्त झालं. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी सांगितलं की, पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यासाठी संभाव्य ठिकाणी पोलिसांचे छापे टाकले जात आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp