पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

मुंबई तक

Pune News : पुणे जिल्ह्यातील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्हावी या गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. एस. एन. कांबळे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ही बाब समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई

point

मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप

point

हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

Pune News : पुणे जिल्ह्यातील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्हावी या गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. एस. एन. कांबळे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ही बाब समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला.

हे ही वाचा : सरकारी कर्मचाऱ्याने बायकोचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर केले व्हायरल, त्याखाली रेटही लिहिला; धक्कादायक प्रकरण

टिळा लावून येण्यास विरोध

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची न्हावी या गावात न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना टिळा लावून येण्यास विरोध केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच टिळा लावलेल्या विद्यार्थांना मुख्याध्यापक अपमानास्पद बोलल्याचा आरोपदेखील करण्यात आला. यामुळे जोरदार वाद होत असल्याचे पहायला मिळत आहे. यानंतर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला.

हे ही वाचा : मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस

हे वाचलं का?