मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस

मुंबई तक

crime news : एका प्रियकराने प्रेयसीशी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. परपुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा खून करून मृतदेह शेतात फेकून दिला, या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पीडित मुलगी दुसऱ्याच्याच प्रेमात 

point

मुलीला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन शेतात बोलावले अन्...

Crime news : झारखंडच्या पाकूर जिल्ह्यात एका प्रियकराने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. परपुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी एका निर्जन शेतात नेत, मित्रांसह सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीचा खून करून मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड, नवऱ्यासह मुलांना सोडून महिला गेली पळून... नंतर झाला पश्चात्ताप

पीडितेचा निर्जन शेतात मृतदेह

पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना पीडितेचा निर्जन शेतात मृतदेह आढळून आला होता. हिरणपूर पोलीस ठाण्याने एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले. आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित अत्याचारातील आरोपींची नावे समोर आली आहेत. राफेल सोरेन असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित मुलगी दुसऱ्याच्याच प्रेमात 

आरोपी राफेलने सांगितलं की, संबंधित तरुणीशी तिला विवाह करायचा होता, पण ती त्याला फसवत होती. ती दुसऱ्याच पुरुषाच्या प्रेमात होती. राफेनलं सांगितलं की, जेव्हा त्याला याबाबत माहिती समजली असता, तरुणीचा काटा काढण्याचा कट रचला होता. 

हे ही वाचा : तीचे अनैतिक संबंध; संतापलेल्या पत्नीने प्रेयसीच्या 18 महिन्यांच्या चिमुकलीला संपवलं! मृतदेह 10 दिवस घरात ठेवला...

मुलीला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन शेतात बोलावले अन् आळीपाळीने केला अत्याचार 

आरोपी राफेलने सांगितलं की, त्याने मुलीला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन शेतात बोलावले, नंतर काही मित्र आधीच घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला, नंतर तिची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी सध्या दोघांना तुरुंगात पाठवले, तर एक अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधागृहात पाठवण्यात आले. 

हे वाचलं का?