आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड, नवऱ्यासह मुलांना सोडून महिला गेली पळून... नंतर झाला पश्चात्ताप

मुंबई तक

Crime News : प्रेमासाठी पती आणि मुलांना फसवून महिला प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकराने तिचा विश्वास संपादन करून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर नग्न व्हिडिओ बनवून गुरुग्रामला बोलावले. केवळ जगाला दाखवण्यासाठी खोटे लग्न केले, नंतर महिलेचे दागिने तसेच काही पैसे घेऊन तो फरार झाला. महिलेने व्हिडिओ बनवून पोलिसांकडे संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

point

आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली

Crime News : हरियाणातील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमासाठी पती आणि मुलांना फसवून महिला प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकराने तिचा विश्वास संपादन करून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, नंतर नग्न व्हिडिओ बनवून गुरुग्रामला बोलावले. केवळ जगाला दाखवण्यासाठी खोटे लग्न केले, नंतर महिलेचे दागिने तसेच काही पैसे घेऊन तो फरार झाला. महिलेने पोलिसांकडे संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रदीप यादव असे आहे. 

हे ही वाचा : ब्राह्मण मुलीसोबत तुमच्यातलाच असल्याचं सांगून संबंध ठेवले, गरोदर झाल्याने लग्नाचा तगादा लावताच धर्मांतरासाठी दबाव

आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला

महिलेने सेक्टर 37 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणात न्यायाची याचना करणारा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पीडितेनं आरोप केला की, चार वर्षांपूर्वी आरोपी प्रदीप यादवने ती आंघोळ करताना तिचा नग्न व्हिडिओ काढला आणि तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडिता नाराज झाली आणि तिने पोलीस ठाणे गाठले आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. 

आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर, आरोपीने तिला जीवे मारहण्याची धमकी दिली. गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. न्यायालयातून बनावट लग्नाचे कागदपत्र मिळवले, नंतर आरोपीने भावनिक नाटक करत महिलेला आपल्यासोबत नेले होते. 

हे ही वाचा : लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास, रजेसाठी पँट उतरवून दाखवल्या जखमा, कर्मचाऱ्यांमध्ये संताप

25 एप्रिल 2023 रोजी पीडितेला गुरुग्राममध्ये आणण्यात आले होते. दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले, नंतर खोट्या लग्नाचा प्रकार उघडकीस आले. तसेच तिच्यावर दारू पिऊन हल्ला करू लागला होता. पीडितेचा आरोप आहे की, त्या आरोपीने 21 फेब्रुवारी 2026 रोजी तिचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp