भारतातून इराणला परतत असलेली युद्धनौका श्रीलंकेत पोहोचताच अमेरिकेचा हल्ला, 87 जणांचा मृत्यू

मुंबई तक

US sinks Iran warship : या युद्धनौकेवर इराणचे एकूण 180 नौसैनिक तैनात होते, त्यापैकी 87 जणांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीलंकेच्या नौदल आणि कोस्ट गार्डने तातडीने राबवलेल्या बचाव मोहिमेत 32 सैनिकांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, उर्वरित 61 सैनिक अद्याप बेपत्ता आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही युद्धनौका बुडत असल्याचा संदेश मिळाला होता.

ADVERTISEMENT

US sinks Iran warship
US sinks Iran warship
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतातून इराणला परतत असलेली युद्धनौका श्रीलंकेत पोहोचताच अमेरिकेचा हल्ला

point

87 जणांचा मृत्यू, युद्धनौकेत एकूण किती लोक होते?

US sinks Iran warship : अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा भडका आता भारताच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय. दक्षिण श्रीलंकेतील गाले किनारपट्टीवर अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणच्या 'आयआरआयएस डेना' या युद्धनौकेवर टार्पेडोद्वारे हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणची युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन समुद्रात बुडाली आहे. विशेष म्हणजे, ही युद्धनौका नुकतीच भारतात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी झाली होती आणि तिथून इराणला परतत असतानाच हा हल्ला करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर टार्पेडोचा वापर करून एखादी युद्धनौका बुडवण्याची ही जगातील पहिलीच घटना असल्याने जागतिक संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

87 जणांचा मृत्यू, 32 जणांना वाचवण्यात यश 

या युद्धनौकेवर इराणचे एकूण 180 नौसैनिक तैनात होते, त्यापैकी 87 जणांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीलंकेच्या नौदल आणि कोस्ट गार्डने तातडीने राबवलेल्या बचाव मोहिमेत 32 सैनिकांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, उर्वरित 61 सैनिक अद्याप बेपत्ता आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री विजिथा हेराथ यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही युद्धनौका बुडत असल्याचा संदेश मिळाला होता. सध्या बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी श्रीलंका नौदलाच्या नौका घटनास्थळी तैनात असून समुद्रात मोठ्या प्रमाणावर तेलाचा तवंग पसरल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : सासऱ्याची लेकीसारख्या सुनेवर वाईट नजर, महिलेच्या कंबरेला चुकीचा स्पर्श... पीडितेनं घरात लावले सीसीटीव्ही

विशाखापट्टणम येथील नौदल सराव आटोपून मायदेशी परतणाऱ्या इराणच्या नौकेला केले लक्ष्य

अमेरिकेने या हल्ल्याची अधिकृत पुष्टी केली असून अमेरिकन पाणबुडीनेच ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. गाले शहरापासून सुमारे 40 नॉटिकल मैल म्हणजेच 75 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला. विशाखापट्टणम येथील नौदल सराव आटोपून मायदेशी परतणाऱ्या इराणच्या नौकेला अशा प्रकारे लक्ष्य केल्यामुळे हिंदी महासागरातील सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. इराणच्या नौदलासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव आता थेट दक्षिण आशियाई समुद्री क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp