मराठवाड्यासंदर्भात सरकारने दिलेली माहिती धक्कादायक; फडणवीसांनी केली कळकळीची विनंती
गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळत असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांना बसला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? ‘राज्यात विशेषत: […]
ADVERTISEMENT
गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळत असून, याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांना बसला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला असून, पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही’, असं सांगत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.
हे वाचलं का?
‘अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे’, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
खोपोली : धबधब्यावर भिजणं जिवावर बेतलं, २ महिलांचा मृत्यू
ADVERTISEMENT
‘कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना, या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे’, असा सल्ला फडणवीसांनी राज्य सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. #MaharashtraRains
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2021
अतिवृष्टीमुळे CET परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी
‘आज शेतकरी असो की, समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे’, असं आवाहन फडणवीसांनी राज्य सरकारला केलं आहे.
Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग
मुख्यमंत्री काय म्हणालेत?
‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत. पण सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचेही आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT