MHADA च्या 8948 घरांची सोडत जाहीर, अशी पाहू शकता लाभार्थ्यांची यादी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक कुटुंबांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. याचं कारण आहे म्हाडाची सोडत. म्हाडाच्या 8 हजार 948 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाने गेल्या महिन्यात ठाणे, पालघर जिल्ह्यातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीसाठी तब्बल 2 लाख 46 हजार अर्ज आले. त्यामुळे या सोडतीची चुरसही वाढली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सोडतीची सुरूवात झाली. यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली होती. या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

सोडतीसाठी दोन लाख 46 हजार 650 नागरिकांनी अर्ज भरले आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची गोड बातमी मिळावी म्हणून ढोल-तुतारीच्या निनादात सोडतीचे नियोजन करण्यात आले होते. ठाण्यातील कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी स्वतःचे ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी, असे आवाहन मंडळाने केले होचे. सोडतीचा निकाल आज सायंकाळी 6 वाजता https://lottery.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी ही माहिती दिली.

हे वाचलं का?

2021 च्या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या 12 महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात आलं आहे. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25 हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 25,001 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 50,001 रुपये ते 75 हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न 75 हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT