वाहतूक पोलिसाला भररस्त्यात नडला, धमकावणाऱ्या इसमाला नंतर पोलिसांनी रडवलं, पाहा व्हिडीओ
आपल्या चारचाकी गाडीला जॅमर लावल्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत भररस्त्यात वाद घालणाऱ्या एका इसमाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मीरा-भाईंदर भागात ही घटना घडली, ज्यात हा इसम पोलिसांना धमकी देताना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी सदर इसमाला अटक केली आहे. रस्त्यात उभं राहून पोलिसांना धमकी देणाऱ्या या इसमाचा पोलिसांच्या कोठडीत ढसाढसा रडतानाचा व्हिडीओही आता सोशल […]
ADVERTISEMENT
आपल्या चारचाकी गाडीला जॅमर लावल्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासोबत भररस्त्यात वाद घालणाऱ्या एका इसमाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मीरा-भाईंदर भागात ही घटना घडली, ज्यात हा इसम पोलिसांना धमकी देताना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसांनी सदर इसमाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
रस्त्यात उभं राहून पोलिसांना धमकी देणाऱ्या या इसमाचा पोलिसांच्या कोठडीत ढसाढसा रडतानाचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मीरा भयंदार! वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात पंगा: धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं…. पार्ट 1 pic.twitter.com/9bgb742Hai
— The मराठी Medium (@MarathiMedium) July 9, 2021
अरुण रतन सिंह असं या आरोपीचं नाव असून तो आपल्या पत्नीसोबत मीरा-भाईंदर येथे कारचे काही पार्ट विकत घेण्यासाठी आला होता. यावेळी नो-पार्कींगमध्ये कार पार्क केल्यामुळे पोलिसांनी अरुण सिंहच्या गाडीला जॅमर लावला. काशी मीरा वाहतूक विभागातील पोलीस हवालदार कृष्णा दबडे यांनी ही कारवाई केली. ज्यानंतर संतापलेल्या अरण सिंहने दबडे यांना धमकी देऊन तुला भररस्त्यात मारेन अशी धमकी दिली.
हे वाचलं का?
पार्ट 2 pic.twitter.com/g9BfGVeoAr
— The मराठी Medium (@MarathiMedium) July 9, 2021
यानंतर पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत, सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देऊन त्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी अरुण सिंहला अटक केली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्यांना यापुढे चाप बसेल असा विश्वास सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT