कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी महाराष्ट्राचं Mission Oxygen-मुख्यमंत्री
देशात कोरोनाची तिसरी लाट येते आहे, सावध राहा असा इशारा केंद्र सरकारच्या विज्ञान विभागाने दिला आहे. मिशन ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्राने स्वयंपूर्ण होणं. तिसरी लाट येऊच नाही याची आपण काळजी घेतो आहोत. पण येत्या काळात आपल्याला सर्वतोपरी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं मिशन ऑक्सिजनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनाची तिसरी लाट येते आहे, सावध राहा असा इशारा केंद्र सरकारच्या विज्ञान विभागाने दिला आहे. मिशन ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्राने स्वयंपूर्ण होणं. तिसरी लाट येऊच नाही याची आपण काळजी घेतो आहोत. पण येत्या काळात आपल्याला सर्वतोपरी काळजी घ्यायची आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं मिशन ऑक्सिजनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन ची आवश्यकता असून यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रत होत असून सुमारे 500 मेट्रिक टन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्य स्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टन ची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटस ची स्थापना करण्यात येत आहे. व त्यातून जवळपास 240 मेट्रिक टन ची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होतील. या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील.
ADVERTISEMENT
सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टन ची आवश्यकता असून यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रत होत असून सुमारे 500 मेट्रिक टन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्य स्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टन ची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटस ची स्थापना करण्यात येत आहे. व त्यातून जवळपास 240 मेट्रिक टन ची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरील सक्रिय होतील. या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील.
महाराष्ट्र सरकार म्हणून आपण काय काय करत आहोत त्याचीही माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोना रूग्णसंख्या काही जिल्ह्यांमध्ये घटत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढते आहे त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. रूग्ण वाढ थोपवण्यासाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 18 ते 44 या वयोगटासाठी 12 कोटी डोस लागणार आहेत. त्यासाठी एकरकमी चेकने पैसे देण्याची तयारी आहे याचा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी केला आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रात दोन दिवसात घटलं लसीकरणाचं प्रमाण, अवघ्या 1 लाख 27 हजार जणांचं लसीकरण
लसींचं उत्पादन हळूहळू वाढतं आहे त्याप्रमाणे लसाींचा पुरवठा होतो आहे. केंद्राला मर्यादा आहेत हे मी जाणतो आहे. त्यामुळे सध्या राज्यातली लसीकरण मोहीम ही काहीशी मंदावली आहे. आज घडीला ऑक्सिजनचा वापर हा 1700 मेट्रिक टन रोज लागतो आहे. 1200 मेट्रिक टन राज्यात निर्मिती होते आहे. तर 500 मेट्रिक टन केंद्राकडून मिळतो आहे. महाराष्ट्र हा 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करतो आहे ती निर्मिती आपल्याला 3 हजार मेट्रिक टनापर्यंत न्यायची आहे असं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रकल्पही उभे राहणार आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
ADVERTISEMENT
मोदी सरकारने SOP ठरवण्यासाठी सात दिवस लावल्याने विदेशातली मदत लांबली, ऑक्सिजन तुटवडा वाढला
ADVERTISEMENT
मिशन ऑक्सिजन हे या मोहिमेला नाव दिलं आहे. मिशन ऑक्सिजन हे महाराष्ट्रात होणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही काही प्रमाणात भासतो आहे. तो पुरवठाही लवकरात लवकर भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. औषधं, लसी, रेमडेसिवीर या सगळ्या गोष्टी कमी कशा पडणार नाहीत हे आम्ही पाहतो आहोत. सर्वात महत्त्वाचा आहे तो ऑक्सिजन. त्याबाबतीत महाराष्ट्राने स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे आणि आपण ते होणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT