आमदार खंडणी वसूल करतात ! माजी जिल्हा प्रमुखांचा शिवसेना आमदार नितीन देशमुखांवर आरोप
अकोला जिल्ह्यात शिवसेना पक्षातला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जिल्ह्याचे माजी प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहून बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. पिंजरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, दिवाकर रावते अशा ज्येष्ठ नेत्यांना हे पत्र लिहीलं असल्यामुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे. […]
ADVERTISEMENT

अकोला जिल्ह्यात शिवसेना पक्षातला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जिल्ह्याचे माजी प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाला पत्र लिहून बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. पिंजरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, दिवाकर रावते अशा ज्येष्ठ नेत्यांना हे पत्र लिहीलं असल्यामुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.
काय आहेत श्रीरंग पिंजरकर यांनी केलेले आरोप?
१) आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर आहेत. जिल्ह्यात खंडणी वसुलीत आमदार देशमुख सर्वात समोर असल्याचा आरोप पिंजरकरांनी पत्रात केला आहे.
२) जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले असल्याचा पिंजरकरांचा आरोप.










