मनसेची आंदोलन विस्मरणात जाण्यासाठी काही यंत्रणा काम करतात : राज ठाकरेंचा आरोप कोणावर?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ वर्षांच्या प्रवासात यशस्वी झालेल्या आंदोलनांवर स्मरण पुस्तिका काढणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ते आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर गट अध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर देखील भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन १६ ते १७ वर्ष झाली. […]
ADVERTISEMENT
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ वर्षांच्या प्रवासात यशस्वी झालेल्या आंदोलनांवर स्मरण पुस्तिका काढणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ते आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर गट अध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर देखील भाष्य केलं.
ADVERTISEMENT
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन १६ ते १७ वर्ष झाली. याकाळात आपण केलेल्या आंदोलनांचा आणि त्यातील यशस्वी आंदोलनांचा स्ट्राईक रेट काढला तर तो इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त आहे. पण ही आंदोलन लोकांच्या विस्मरणात कशी जातील यासाठी काही यंत्रणा काम करत आहेत.
मी टोल आंदोलन हातात घेतल्यानंतर ६५ ते ७० टोल नाके बंद झाले. पण कोणीही आंदोलन करत नाहीत, त्यावर भूमिका घेत नाहीत, त्यांना एकही प्रश्न विचारला जात नाही. २००८ सालच्या रेल्वे आंदोलनालाही वेगळी दिशा देण्यात आली. पण या महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार आणि नोकऱ्या मिळण्यासाठी ते आंदोलन केलं होतं. ते काही देश फोडण्याचं आंदोलन नव्हतं. पण ही भूमिका समजून न घेता वेगळी दिशा देण्यात आली. खास करुन हिंदी टिव्ही चॅनेलवाल्यांनी, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
हे वाचलं का?
मनसे पुस्तिका काढणार :
राज ठाकरे यांनी यावेळी १६ वर्षांच्या प्रवासात यशस्वी झालेल्या आंदोलनांवर एक स्मरणपुस्तिका काढणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले एक पुस्तिका काढत आहे. यात मनसेने कोणती आंदोलन केली. कोणती यशस्वी झाली, त्याची माहिती देणारी ही पुस्तिका असणार आहे. पुढच्या पंधरा दिवसांत ही पुस्तिका येणार आहे. ती वाचा आणि त्यातून कळेल तुम्हाला की आपण किती आंदोलन यशस्वी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT