महाराष्ट्रातला लस तुटवडा भरून काढण्यासाठी मोदी सरकारने विचार करावा-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून लसीकरण उत्सव साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मात्र महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे हे वास्तव आहे. अशात आता केंद्र सरकारने महाराष्ट्रातील लस तुटवडा भरून काढण्यासंदर्भात विचार करावा असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न कमी पडत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

लसीकरणाच्या बाबतीत दिल्लीश्वरांची मोगलाई औरंगजेबाच्याही वरताण-शिवसेना

सध्य महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रूग्णसंख्या आणि अॅक्टिव्ह केसेस आहेत. अशावेळी राजकारण विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवं असंही आवाहन संजय राऊत यांनी केलं. महाराष्ट्रात सध्या लसीकरण मोहिमेत लसींचा तुटवडा भासू लागल्याने काही ठिकाणी स्थगिती द्यावी लागली आहे. अशात महाराष्ट्राने लस महोत्सव कसा साजरा करायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आमच्या भावना लक्षात घ्याव्यात. कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे त्यावरून लस पुरठवा ठरवू नका असंही आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

लसीकरणात ‘या’ व्यक्तींना मिळणार प्राधान्य, सरकारकडून निकष जाहीर

महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट हे सर्वाधिक आहे. अशा वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन एकजुटीने या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. आपसातले मतभेद विसरून त्यांनी कोरोना निर्मूलनासाठी काम केलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. सरसंघचालक मोहन भागवत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर नांदेडचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. अशावेळी कोणतेही मतभेद कुणीही ठेवता कामा नयेत. कोरोना निर्मूलन लवकरात लवकर कसं करता येईल ही सर्व पक्षीयांची भावना हवी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT