Mood Of The Nation : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान म्हणून भाजपच्या कोणत्या नेत्याला सर्वाधिक पसंती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात देशात जर आज घडीला निवडणूक झाली तर कोण सरकार स्थापन करू शकतं? या प्रश्नाचं आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे-सी व्होटर्स यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून एक सर्व्हे केला आहे. आज निवडणूक झाली तरीही भाजपचं सरकार देशात येईल आणि पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील अशी उत्तरं बहुतांश लोकांनी दिली आहेत. आता आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमधल्या कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून पाहायला लोकांना आवडेल? या प्रश्नाचं उत्तर.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतर पंतप्रधान म्हणून देशातल्या जनतेची भाजपच्या कोणत्या नेत्याला पसंती?

हे वाचलं का?

अमित शाह -23.8 टक्के

योगी आदित्यनाथ-23.1 टक्के

ADVERTISEMENT

नितीन गडकरी-11.2 टक्के

ADVERTISEMENT

राजनाथ सिंह-8.7 टक्के

निर्मला सीतारामन-4.6 टक्के

एकंदरीत सर्व्हेमध्ये लोकांनी ज्या प्रमाणात नेत्यांबाबत उत्तरं दिली आहेत त्यामध्ये अमित शाह हे पहिलं नाव आहे. 23.8 टक्के लोकांनी मोदींनंतर अमित शाह पंतप्रधान होतील असं म्हटलं आहे. अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्या काँटे की टक्कर आहे असंही दिसून येतं आहे. कारण योगी आदित्यनाथ हे मोदीनंतर पंतप्रधान होतील असा अंदाज 23.1 टक्के लोकांनी वर्तवला आहे. तर या रेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नितीन गडकरी आहेत.

Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

तर 2024 मध्ये पंतप्रधान कोण होईल हा प्रश्न जेव्हा इंडिया टुडे सी व्होटर्सने विचारला तेव्हा 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. तर सात टक्के लोकांनी राहुल गांधींच्या बाजूने मतं दिली आहेत. 6 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. 4 टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे. मात्र मोदींची लोकप्रियता आणि प्रभाव हा अद्यापही कमी झालेला नाही हेच या सर्व्हेवरून दिसून येतं आहे.

मोदी सरकारच्या कामकाजावरही सर्व्हेमध्ये मतं दिलेल्यांपैकी 63 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. 15 टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी ठिकठाक आहे असं म्हटलं आहे. तर 21 टक्के लोकांनी मोदी सरकारची कामगिरी सुमार आहे असं म्हटलं आहे. यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला की NDA च्या सरकारवर किती टक्के लोक समाधानी आहेत? यावर सर्व्हेमध्ये मतं दिलेल्यांपैकी 59 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. तर 26 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT