महाराष्ट्रात 12 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 254 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 645 रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 60 लाख 58 हजार 751 Corona बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट आहा 96.54 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

आज महाराष्ट्रात दिवसभरात 6 हजार 258 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात दिवसभरात 254 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 71 लाख 76 हजार 715 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 76 हजार 57 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 98 हजार 933 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 456 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 82 हजार 82 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 258 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 76 हजार 57 इतकी झाली आहे.

मुंबईत 343 नवे रूग्ण

हे वाचलं का?

मुंबईत दिवसभरात 343 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर 466 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 11 हजार 315 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के झाला आहे. तर मुंबईचा डबलिंग रेट हा 1377 दिवसांवर गेला आहे.

एकीकडे राज्यात तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे. तिसरी लाट येऊ शकते या अनुषंगाने महाराष्ट्रात निर्बंध कायम आहे. तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध राज्यात लागू आहेत. अशात बीड आणि सोलापूरमध्ये वाढते रूग्ण हे तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरतात की काय अशी भीती व्यक्त होते आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये प्रमाण वाढलं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. पहिली लाट ओसरली त्यावेळी पहिल्या लाटेतून बाहेर पडत असतानाच दुसरी लाट कधी आली ते कळलंच नाही. अशात आता या दोन जिल्ह्यांनी चिंता वाढवली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT