लग्नात 25 पेक्षा जास्त लोक, मंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड; सांगली महापालिकेची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लग्न समारंभात 25 पेक्षा जास्त लोक आढळून आल्याने मंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सांगली महापालिकेने ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनचेच निर्बंध ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यत आले आहेत. अशात लग्न समारंभासाठी 25 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये आणि 2 तासां मध्ये लग्न समारंभ पार पाडावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं पालन न केल्यास 50 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

सांगलीत नियमांचं उल्लंघन झाल्याने मंगल कार्यालयाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लग्नामध्ये 25 लोकांपेक्षा जास्त लोक जमले होते. त्यामुळे मिरजमध्ये जात महापालिका अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे मालक ओंकार जोशी यांना 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध

हे वाचलं का?

22 एप्रिलपासून लागलेले निर्बंध काय आहेत?

लग्न समारंभ

ADVERTISEMENT

लग्न समारंभासाठी आता हॉलमध्ये फक्त दोन तासांसाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थित राहता येईल. जर एकाही कुटुंबाने लग्न समारंभाचा हा नियम मोडला तर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जाईल. लग्न समारंभाला हजर राहतानाही कोव्हिड 19 प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक

ADVERTISEMENT

नागपूर : सासरच्या मंडळींचा लग्न पुढे ढकलण्यास नकार, रुग्णसेवेसाठी डॉक्टरने लग्न मोडलं

वाहतूक विषय नियमांमध्ये बदल

खासगी प्रवाशांना फक्त तातडीच्या कारणासाठी किंवा अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करता येईल. बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रवाशांना मुभा.

प्रवाशाला त्याच्या मूळ गावी जायचं असेल तर त्यांना प्रवासाची मुभा आहे. मात्र अत्यावश्यक कारणासाठीच गावी जाता येईल. फिरण्यासाठी गावी जाण्याची किंवा इतर कुठे प्रवास करण्याची मुभा नाही

अंत्यविधी किंवा त्या कारणाइतकं तातडीचं कारण असेल तर प्रवास करण्याची मुभा आहे, आवश्यक सेवा किंवा तातडीचं कारण या शिवाय सर्व कारणांसाठी प्रवासावर निर्बंध आहेत जर या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर 10 हजारांचा दंड घेतला जाईल

खासगी बसेसनाही त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी नेण्याची मुभा देण्यात आली आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT