महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 301 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजार 993 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 45 हजार 391 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत 26 लाख 95 हजार 148 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.96 टक्के इतके झाले आहे. रूग्णसंख्या रोज वाढत असल्याने रिकव्हरी रेटही कमी झाला […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 58 हजार 993 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 45 हजार 391 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत 26 लाख 95 हजार 148 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.96 टक्के इतके झाले आहे. रूग्णसंख्या रोज वाढत असल्याने रिकव्हरी रेटही कमी झाला आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रिकव्हरी रेट 92 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. महाराष्ट्रात दिवसभरात 301 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.74 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 16 लाख 31हजार 258 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 32 लाख 88 हजार 540 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 26 लाख 95 हजार 65 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर 24 हजार 157 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 5 लाख 34 हजार 603 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज 58 हजार 993 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 32 लाख 88 हजार 540 इतकी झाली आहे.
हे वाचलं का?
नागपूर : कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, पती आणि नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड
दिवसभरात नोंद झालेल्या 301 मृत्यूंपैकी 158 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 91 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरीत 52 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे मृत्यू पुणे 18, नागपूर 10, सोलापूर 7, नाशिक 5, जालना 3, नांदेड 3, नंदूरबार 2, सांगली 2, हिंगोली 1 आणि परभणी 1 असे आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आज मुंबईतही 9 हजारांपेक्षा जास्त रूग्ण
आज मुंबईत दिवसभरात 9200 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील 24 तासात 5 हजार 99 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 3 लाख 97 हजार 613 बरे झाले आहेत. आज घडीला मुंबईत 90 हजार 333 अॅक्टिव्ह केसेस आहेत. दुपट्टीचा दर 34 दिवस आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णसंख्या
मुंबई – 88 हजार 53
ठाणे- 67 हजार 479
पुणे- 1 लाख 51
नाशिक- 36 हजार 19
अहमदनगर-16 हजार 287
जळगाव-8 हजार 581
औरंगाबाद-16 हजार 920
नांदेड-12 हजार 540
नागपूर-63 हजार 36
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT