कल्याण रेल्वे स्थानकातून सासू-सुनेला अटक, नेमकं काय करायच्या दोघी?
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र आता चोऱ्या करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. रेल्वे स्थानकात मोबाइलवर डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसरी-तिसरी कोणाची नाही, तर चक्क सासू आणि सुनेचीच असल्याचं उघड झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोकल ट्रेनमधील वाढत्या चोरीच्या […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकात किंवा धावत्या ट्रेनमध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र आता चोऱ्या करणाऱ्या एका जोडीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. रेल्वे स्थानकात मोबाइलवर डोळा ठेवून चोऱ्या करणारी ही जोडी दुसरी-तिसरी कोणाची नाही, तर चक्क सासू आणि सुनेचीच असल्याचं उघड झालं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या अनेक दिवसांपासून लोकल ट्रेनमधील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेऊन रेल्वे क्राईम ब्रांचनं सापळा रचून चोरट्या सासू-सुनेला कल्याणमधून अटक केली आहे.
कल्याणनजीक उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एक महिलेनं आपली पर्स चोरी झाल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली होती. या पर्समध्ये तब्बल 3 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. तपोवन एक्स्प्रेस गाडी पकडत असताना ही चोरी झाली होती.
हे वाचलं का?
11 डिसेंबरला चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवत कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. पोलिसांनी अतिशय बारकाईने सीसीटीव्ही तपासलं.
यावेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला पळ काढताना आढळून आल्या. या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानं पोलिसांचं काम अधिकच सोपं झालं.
ADVERTISEMENT
दोन्ही महिलांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही महिलांना सापळा रचून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या सासूचं नाव रेखा कांबळे असं असून सुनेचं नाव रोझा कांबळे असं आहे. या दोघींची चौकशी केली असता त्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील रहिवासी असल्याचे सांगत तीन गुन्ह्याची कबुली दिले आहे.
ADVERTISEMENT
मुंबईकडे येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; लाखो रुपये जप्त
या दोन्ही आरोपी सासू-सुनेकडून तब्बल 4 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलीस आता आरोपी महिलांची अधिक चौकशी करत असून त्यांचा आतापर्यंत किती गुन्ह्यात सहभाग होता याचा देखील तपास केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT