Dhule Accident : तीन कार उडवल्या आणि ट्रक घुसला हॉटेलमध्ये, 10 जण ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Road Accident On Highway : महाराष्ट्रात सध्या रस्ते अपघातांची मालिका सातत्याने सुरू आहे. नुकत्याच घडलेल्या बुलढाण्यातील भीषण अपघातातून महाराष्ट्र सावरलेला नसताना धुळ्यात पुन्हा एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. 14 चाकी कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात घडला. या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये घुसला आणि उलटला. हा कंटेनर भरधाव वेगाने येत आधी कारला आणि नंतर आणखी एका वाहनाला धडकला. घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमधून ही माहिती मिळते. (Mumbai Agra Highway Road Accident in Dhule District)

ADVERTISEMENT

अपघातात 10-15 जणांच्या मृत्यूची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता!

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत 10-15 जणांच्या मृत्यूची भीती तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्याता आहे. तसंच, 15 ते 20 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्याला सुरूवात झाली आहे.

Shiv Sena: अजित पवारांच्या एंट्रीमुळे शिंदे गटाला छळतेय ‘ही’ भीती; वाचा Inside Story

अपघातात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत असून चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तीनही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.

हे वाचलं का?

भरधाव वेगाने कंटेनर थेट हॉटेलमध्येच शिरला

मुंबई-आग्रा महामार्गावरून कंटेनर भरधाव वेगाने जात होता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये कंटेनर घुसला. हॉटेलबाहेर अनेक वाहने उभी होती. हा कंटेनर वाहानांना उडवून हॉटेलमध्ये घुसला. यामुळे अनेक वाहनांच नुकसान झालं आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. पोलिसांचे पथक बचाव कार्यात गुंतले आहे.

शरद पवारांचे निर्णय प्रफुल पटेल बदलू शकतात का? आता पुढे काय होणार?

परिसरातील वाहतूक अपघातानंतर खोळंबली असून बघ्यांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बचाव कार्यात देखील मोठ्या प्रमाणावर अडथळे येत असल्याचं समजतंय. तर घडलेल्या या अपघातामुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT