मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून मुंबईतली उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. पण आता राज्य सरकारनं कोरोना नियम शिथिल केल्यानं लवकरच पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवास घडणार आहे. तसंच काल मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं लोकलबाबत एक मोठा निर्णय घेतलाय.

ADVERTISEMENT

मध्य आणि पश्चिम रेल्वेने शुक्रवारपासून लोकल सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार, आता मध्य रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये वाढ होणार आहे. सध्या दिवसभरात मध्य रेल्वेच्या १५८० लोकल धावत आहेत. त्या वाढून आता १६५० करण्यात येणार आहेत. तसंच पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवाही सध्याच्या १२०१ वरून वाढवून १३०० करण्यात येणार आहे.

लोकल सेवांमध्ये वाढ करण्यात येणार असली तरी सध्या याचा लाभ मात्र केवळ अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनाच मिळणार आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेचा हा निर्णय आलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT