मुंबई नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेवर अपघात, एक जण ठार तर तिघे जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर रविवारी झालेल्या अपघातात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर या अपघातात तिघेजण जखमी झाले. ७०१ किमी लांबीचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग वाहनांसाठी खुला झालेला नाही. मात्र अपघातांची संख्या वाढते आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता.

ADVERTISEMENT

अनेक चालक या मार्गाचा वापर करत आहेत, मात्र या मार्गावर सुरक्षा व्यवस्था नाही. या अपघातात बळीराम खोकले वय ४५ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ते बुलढाणा येथील रहिवासी होते. खोकले यांच्यासह इतर दोघेजण प्रवास करत होते. या दोघांची नावं चंद्रकांत साबळे, सुनील लिंबेकर अशी आहेत. हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी ५ वाजता हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होती की अपघात झालेली कार एक्स्प्रेस वेच्या मध्यभागी दुभाजक बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. अपघाताची धडक जोरदार असल्याने कारचा चक्काचूर झाला. या कारचा चालक योगेश सांगळे हादेखील या अपघातात जखमी झाला आहे.

हे वाचलं का?

Mumbai : वरळी सी लिंकवर टॅक्सीने ठोकर दिल्याने दोघांचा हवेत उडून अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद

चार जणांचा अपघात झाल्यानंतर चारही जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर खोकले यांना मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. खोकले हे बुलढाण्याचे रहिवासी होते. घटना घडली तेव्हा ते औरंगाबादहून आपल्या गावी परतत होते.

ADVERTISEMENT

सुरूवातीला मुसळधार पाऊस झाल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. मात्र कारचा टायर फुटून अपघात झाल्याचं नंतर समोर आलं आहे. खोकले हे हॉटेल व्यावसायिक असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ADVERTISEMENT

नाशिकमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात, 6 मजुरांचा जागीच मृत्यू

प्रकल्पाचा पहिला टप्पा, नागपूर ते वाशिममधील शेलू बाजार दरम्यानचा २०१ किमीचा पट्टा, या वर्षी २ मे मध्ये लोकांसाठी खुला करण्यात येणार होता. दरम्यान नागपूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या वन्यजीव ओव्हरपास, ज्यावर वन्यप्राण्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी रस्त्यावर बांधकाम सुरू होते, त्याला तडे गेले आणि नुकसान झाले. एमएसआरडीसीने आता त्याच्या जागी पूर्णपणे नवीन संरचना उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला आहे.

जानेवारी २०१९ मध्ये सुरू झालेला, संपूर्ण प्रकल्प सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. दरम्यान कोविड-१९ महामारीमुळे आणि प्रकल्पाच्या काही भागांच्या कामाची गती यामुळे विलंब झाला. MSRDC आता एक्स्प्रेस वे जून २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने खुला करण्याची योजना आखली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT