मुंबईच्या वडापावला मिळाला संपूर्ण शाकाहारी पदार्थाचा दर्जा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतला वडापाव हे मुंबईतलं प्रसिद्ध खाद्य आहे. अनेक लोकांच्या दिवसाची सुरूवात वडापावने होते. स्वस्त आणि मस्त वडापावचा पर्याय अनेकदा लोक जेवण म्हणूनही स्वीकारतात. आता या वडा पावला Animal राईट्स ग्रुप PETA India ने Fully Vegan अर्थात पूर्ण शाकाहारी पदार्थाचा दर्जा दिला आहे.

ADVERTISEMENT

10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिवस असतो. त्या दिवसाचं औचित्य साधून PETA ने वडापावला संपूर्ण शाकाहारी पदार्थाचा दर्जा दिला आहे. एवढंच नाही तर शेव-पुरी, रगडा पॅटीस, मिसळ पाव, पोहे या पदार्थांनाही संपूर्ण शाकाहारी पदार्थांचा दर्जा देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

तुम्ही तुमचं खाणं हुशारीने निवडा असं PETA ने म्हटलं आहे. पेटा लवकरच आता 2021 चं संपूर्ण शाकाहारी अन्न म्हणून वडा पाव ची निवड झाल्याचं पोस्टर्स मुंबईतल्या टॅक्सीजवर लावणार आहेत. ज्यामुळे वडापावला हा खास दर्जा मिळाला आहे याची माहिती प्रत्येक मुंबईकराला होईल आणि त्याचा अभिमान वाटेल.

काय म्हटलं आहे PETA ने?

ADVERTISEMENT

‘मुंबईमधे मिळणारा सर्वात स्वस्त पदार्थ म्हणजे वडापाव. वडापाव तयार करताना कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहचवली जात नाही. त्यामुळे स्ट्रीट फूड असणाऱ्या आणि हॉटेलमध्येही मिळणाऱ्या या पदार्थाला आम्ही संपूर्ण शाकाहारी पदार्थाचा दर्जा देत आहोत.’

ADVERTISEMENT

पेटा इंडियाच्या न्युट्रिशन स्पेशालिस्ट डॉ. किरण अहुजा म्हणाल्या ‘आम्ही स्थानिकांना आणि इथे भेट देणाऱ्या प्रवाशांना आम्ही शुद्ध शाकाहारी पदार्थांचे काय चांगले पर्याय असू शकतात ते सुचवत असतो. त्यांनी अंडी, मटण किंवा चिकन खाण्याऐवजी शाकाहारी पदार्थांचे पर्याय आम्ही त्यांना सुचवत असतो. आता त्या पदार्थांमध्ये वडापावचा समावेश झाला आहे. ‘

मुंबईतल्या देवनारच्या कत्तलखान्यात 6 हजार शेळ्या-मेंढ्या, 300 म्हशी, 300 डुकरं रोज कापली जातात. यासंदर्भातले चित्रीकरण पेटा इंडियाने केले आहे. मटण, अंडी किंवा मांसाहार करण्याऐवजी आम्ही शाकाहारी पदार्थ खाण्यावर जोर देत असतो असंही पेटाने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईत अनेक भागांमध्ये वडापाव बनवला जातो आणि विकला जातो. एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्याही विविध ठिकाणी वडापाव तयार केला जातो. स्वस्त आणि मस्त म्हणून वडापाव प्रसिद्ध आहे. हा पदार्थ तयार केला जात असताना कोणत्याही प्राण्याला इजा होत नसल्याने पेटा इंडियाने या पदार्थाला संपूर्ण शाकाहारी पदार्थ असा दर्जा देऊन त्याचा गौरव आणखी वाढवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT