Mumbai चा ‘टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट’ 10 टक्क्यांच्या खाली, दिवसभरात 6 हजारांपेक्षा जास्त रूग्ण कोरोनामुक्त
मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आला आहे. महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चह यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारी मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 9.94 टक्के इतका नोंदवला गेला असंही त्यांनी स्पष्ट केलं. दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 3925 नवे रूग्ण आढळून आले. तर 6 हजार 380 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. Corona ची दुसरी लाट कधी […]
ADVERTISEMENT
मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आला आहे. महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चह यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारी मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 9.94 टक्के इतका नोंदवला गेला असंही त्यांनी स्पष्ट केलं. दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 3925 नवे रूग्ण आढळून आले. तर 6 हजार 380 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
ADVERTISEMENT
Corona ची दुसरी लाट कधी आटोक्यात येईल? इकबाल सिंह चहल यांनी दिलं उत्तर
आत्तापर्यंत मुंबईत एकूण 5 लाख 72 हजार 431 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत दिवसभरात 89 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात 43 हजार 525 चाचण्या पार पडल्या. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या कमी होते आहे. आता पॉझिटिव्हिटी रेटही 10 टक्क्यांच्या खाली आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 6 लाख 48 हजार 624 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
हे वाचलं का?
मुंबईत आत्तापर्यंत एकूण 5 लाख 72 हजार 431 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 54 लाख 23 हजार 998 चाचण्या पार पडल्या आहेत. दिवसभरात ज्या मृत्यूंची नोंद झाली त्यापैकी 42 रूग्ण सहव्याधी असलेले होते. तीन मृत्यू हे वय वर्षे चाळीसपेक्षा कमी वय असलेल्यांचे होते. दिवसभरात नोंद झालेल्या 89 मृत्यूंपैकी 56 पुरूष आणि 33 महिला होत्या. मुंबईतलं रूग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 88 टक्के इतका झाला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचे मृत्यू का वाढताहेत?
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले चहल?
ADVERTISEMENT
मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हात एकेरी संख्येवर आला आहे. दिवसभरात सुमारे 44 हजार चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 3 हजार 925 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. एवढंच नाही तर जे नवे रूग्ण आढळले आहेत त्यातले 85 टक्के रूग्ण लक्षणं नसलेले आहेत.
गेल्यावर्षी जेव्हा मुंबईचे आयुक्त म्हणून चहल यांनी पदभार स्वीकारला होता तेव्हा मुंबईचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20.85 टक्के इतका गेला होता. तर आत्ताचा आपला उच्चांक हा 27 टक्क्यांवर गेला होता 3 एप्रिलला 51 हजार 313 चाचण्या झाल्या होत्या त्यापैकी 11 हजार 573 जण बाधित झाले होते. अशीही माहिती चहल यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT