साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, तरूणाचाही आत्महत्येचा प्रयत्न
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात एकतर्फी करणाऱ्या युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने खून केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल राजेंद्र राजे (वय २५, रा. पिंपोडे बुद्रुक) असे संशयित युवकाचे नाव आहे. काय आहे प्रकरण? निखिल राजे या तरूणाचे […]
ADVERTISEMENT
इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात एकतर्फी करणाऱ्या युवकाने अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने खून केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संशयित युवकानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. निखिल राजेंद्र राजे (वय २५, रा. पिंपोडे बुद्रुक) असे संशयित युवकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
हे वाचलं का?
निखिल राजे या तरूणाचे ११ वीला शिकणाऱ्या एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिला त्याने आज चाकूने भोसकले. तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेत मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कादायक घटनेमुळे पिंपोडे गाव हादरलं आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील एक अल्पवयीन मुलगी अकरावीमध्ये शिकत होती. आज (रविवार) सकाळी ती खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी गेली होती. संशयित युवकाने क्लासमध्ये जावून तिला चाकूने भोकसले आणि तो घटना स्थळावरून तो पसार झाला.
ADVERTISEMENT
गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने सातारा येथील एका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, तिच्यावर हल्ला करणाऱ्या युवकानेसुध्दा विषारी औषध प्राशन केले. त्याला कोरेगाव येथील दवाखान्यात दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT