Mumbai Tak Impact: पीएचडी विद्यार्थिनींचा मानसिक छळ, ‘त्या’ प्राध्यापकांची चौकशी होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठात हिंदी विभागामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांविरुद्ध अमपानास्पद वागणूक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दोन विद्यार्थिनींनी केली होती. मुंबई तक ने या वृत्ताची दखल घेतल्यानंतर विद्यापीठाचं झोपी गेलेलं प्रशासन जागं झालं आहे. या प्रकरणाची आरोपांची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने एका समितीची स्थापना केली आहे.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरींनी या दोन्ही विद्यार्थिनींच्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थिनींनी आरोप केलेले हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मनोज पांडे यांची आता चार सदस्यीय समितीकडून चौकशी केली जाणार आहे. याबद्दल कुलगुरुंनी अधिकृत पत्रक काढलं आहे.

हे वाचलं का?

प्राध्यापक पांडे यांच्याकडून होत असलेल्या जाचाबद्दल विद्यार्थिनींनी ७ मार्चला विद्यापीठाकडे तक्रार दाखल केली होती. परंतू आठवडाभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मुंबई तक ने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

पीएचडीच्या विद्यार्थिनींचा मानसिक छळ; अपमानास्पद वागणूक, पैशांची मागणी केल्याचा आरोप

ADVERTISEMENT

काय आहेत विद्यार्थिनींनी केलेले आरोप?

पीएचडीसाठी संशोधन आणि विषयाचा आराखडा सादर करताना हिंदी विभागातील प्राध्यापक पांडे यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. तसेच कागदपत्रांवर सही करण्यासाठी जाणूनबुजून उशीर करत आराखडा दाखल करुन घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला होता. त्यामुळे या प्रकरणात आता विद्यापीठाची चौकशी समिती काय पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT