मोदी डरपोक, त्यांनी देशाचा एक तुकडा चीनला दिला – राहुल गांधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेल्या राहुल गांधींनी सलग दुसऱ्या दिवशी मोदी सरकारला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. शुक्रवारी सकाळी राहुल गांधींनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. ज्यात भारत-चीन सीमेवरील वादात पंतप्रधान मोदी हे डरपोक असून ते चीनसमोर झुकले आणि त्यांनी देशाचा एक तुकडा चीनला दिल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधींनी केला.

ADVERTISEMENT

२०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाम सीमेवर झालेल्या संघर्षात १६ भारतीय जवांनाना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर अजुनही दोन्ही देशांमतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. परंतू अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी फिंगर ३ पर्यंत भारतीय सैन्य गस्त घालत असल्याचं सांगितलं. फिंगर ४ पर्यंत भारतीय सैन्य याआधी गस्त घालायचं, त्या भागावर आपली सत्ता होती. परंतू मोदींनी हा भाग चीनला देऊन टाकला. मोदींनी याचं उत्तर देशाला देणं अपेक्षित असल्याचंही राहुल गांधी म्हणाले.

भारताची जमीन चीनला देऊन नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांच्या बलिदानाचा अपमान केला असून याचं उत्तर मोदींना द्यावं लागेल असंही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान राहुल गांधी आज राजस्थान दौऱ्यावर असून ते किसान महापंचायतीत सहभागी होऊन केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांशी बोलणार आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT