Nashik Oxygen Leak : प्रकरणी झाकीर हुसैन रूग्णालयाचं CCTV फुटेज आलं समोर
नाशिक महापालिकेचं कोव्हिड रूग्णालय असलेल्या डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयातील गळती प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. 21 एप्रिलला या रूग्णालयातल्या ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरला जात असताना ऑक्सिजन गळतीची घटना घडली होती. ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरताना प्रेशर कंट्रोल न झाल्याने गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे 22 जणांचा ऑक्सिजन अभावी […]
ADVERTISEMENT
नाशिक महापालिकेचं कोव्हिड रूग्णालय असलेल्या डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयातील गळती प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. 21 एप्रिलला या रूग्णालयातल्या ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरला जात असताना ऑक्सिजन गळतीची घटना घडली होती. ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरताना प्रेशर कंट्रोल न झाल्याने गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे 22 जणांचा ऑक्सिजन अभावी जीव गेला. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये?
21 एप्रिलच्या दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली. टँकरमधून ऑक्सिजन भरला जात असताना एकाएकी गळती झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 15 दिवसात अहवाल सादर करणार आहे.
हे वाचलं का?
काय घडली घटना?
बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत सुरूवातीला 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतीव दुःख व्यक्त केलं आहे. . राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. अशात नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो रूग्णालय परिसरात सगळीकडे पसरला. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा ते पाऊण तास खंडीत झाला होता. जो नंतर पूर्ववत करण्यात आला.
ADVERTISEMENT
सात सदस्यीय चौकशी समिती करणार घटनेची चौकशी
ADVERTISEMENT
नाशिकमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्याने तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT