Navneet Rana : राणांची टीका; सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खासदार नवनीत राणा आणि आमदारा रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला असल्यानं आज मुंबईत गोंधळ सुरू आहे. या राड्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृतपणाचा मला अभिमान वाटतो, असं सुळे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

खासदार सुप्रिया सुळे यांना पुरोगामी महाराष्ट्रातील अशा वातावरणाकडे तुम्ही कसं बघता. कारण सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हेच मला म्हणायचं आहे. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. या प्रकारावर तुमचं काय मत आहे, “माझं काही मत नाही. मला असं वाटतं की लोक त्यांना पाहिजे ते बोलत असतात. करत असतात. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून राजकारणात कशासाठी आलोय, याचं आत्मचिंतन मी स्वतः तरी करते.”

Navneet Rana : ‘मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला शनि’; रवि राणा हनुमान चालीसा पठणावर ठाम

हे वाचलं का?

“मी राजकारणात आणि समाजकारणात लोकांच्या आयुष्यात एका चांगला बदल घडवण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी आले. ते कामातून आणि आकडेवारीतून दिसेल की, मी त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतेय.”

मुख्यमंत्र्यांवर होत असलेल्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, ते किती सुसंस्कृत आहेत. त्यांच्यावर कितीही हल्ले झाले, तरी त्यांनी आजपर्यंत एक शब्दही काढलेला नाही. त्यांनी त्यांचा सुसंस्कृतपणा आणि त्यांच्यावर झालेल्या संस्कार जे आपले मराठी आणि भारतीय संस्कार आहेत. याचं मला कौतूक वाटतं आणि अभिमानही वाटतो.”

“गेले ५५ ते ६० वर्ष जर एका माणसाचं नाव घेऊन हेडलाईन होत असेल, तर त्या माणसाचं नाणं हे मार्केटमध्ये किती खपत याचंच एक उदाहरण आहे.” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

या प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले, “राणा दाम्पत्य कसं आहे, हे अमरावतीकरांना चांगलं माहितीये. महाराष्ट्रालाही माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार त्या आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच बाजू बदलली. गांभीर्याने घेण्यासारखी परिस्थिती नाही. तणाव निर्माण होण्याची आवश्यकता नाही, असं माझं मत आहे,” अशी भूमिका पाटील यांनी मांडली.

ADVERTISEMENT

Hanuman Chalisa: बॅरिकेट्स तोडून शिवसैनिक घुसले राणांच्या इमारतीत

“मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्याबद्दलची माहिती रात्री उशिरा मिळाली. अशा प्रकारे हल्ला कुणावर होणं योग्य नाही. पण हल्ला कुणी केला याचा निष्कर्ष तपासा आधी काढणं योग्य नाही. हल्ला कुणी केला, का केला, हल्ला झाला, तर हल्लेखोर कोण होते, याचा तपास होणं आवश्यक आहे. सिग्नलला गाडी उभी राहिल्यानंतर हल्ला करणं आणि नंतर ती निघून जाणं हे सगळं व्यवस्थित तपासलं पाहिजे,” असं जयंत पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT