Navneet Rana health update : नवनीत राणांची डॉक्टरांनी केली MRI तपासणी
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा तुरुंगातून बाहेर आल्या असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या. जामीन मिळाल्यानंतर ५ मे रोजी त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील दोन दिवसांपासून नवनीत राणा […]
ADVERTISEMENT
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा तुरुंगातून बाहेर आल्या असून, सध्या त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर खासदार नवनीत राणा भायखळा येथील तुरूंगात होत्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
जामीन मिळाल्यानंतर ५ मे रोजी त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मागील दोन दिवसांपासून नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, राणांकडून सोशल हॅण्डलवर रुग्णालयातील काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
रुग्णालयात नवनीत राणांची एमआरआय चाचणी करतानाची ही छायाचित्रे आहेत.
नवनीत राणांना मानेचा त्रास होत असल्याने थेट तुरुंगातून लिलावती रुग्णालयात नेण्यात आले होते.
तपासणी करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्यांना भरती करून घेण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राला शनि लागला असून, त्यामुळे मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करायचं आहे, असं राणा दाम्पत्य म्हटलं होतं.
त्यासाठी ते मुंबईतही आले होते. यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांना अटक केली होती.
ADVERTISEMENT