सरनाईकांच्या आरोपांवर NCP ची सावध प्रतिक्रीया, जयंत पाटील म्हणतात…
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करावी असा सल्ला सरनाईकांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरेंना दिला आहे. सत्तेत सोबत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप सरनाईकांनी केला. मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही आपल्या आमदारांची […]
ADVERTISEMENT
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करावी असा सल्ला सरनाईकांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरेंना दिला आहे. सत्तेत सोबत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप सरनाईकांनी केला.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही आपल्या आमदारांची काम होतं नाहीत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची काम होतात अशी नाराजी आपल्या आमदारांमध्ये असल्याचंही सरनाईकांनी पत्रात म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादीने या आरोपांवर सावध प्रतिक्रीया दिली आहे. “सरनाईकांनी जे लिहीलं आहे त्यापाठीमागचा भाव वेगळा असावा. शिवसेनेतून काँग्रेस-राष्ट्रवादीत माणसं आल्याचं मला तरी दिसत नाही. शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. मतदारसंघाबद्दलचा त्यांनी जो मुद्दा मांडलाय त्यात त्यांच्या मतदारसंघात असा काही अनुभव त्यांना आलाय का हे तपासून पहावं लागेल”, अशी प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप
हे वाचलं का?
जयंत पाटील सांगतील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसलाही जयंत पाटलांनी सूचक इशारा दिला आहे. “राज्यातले तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि निवडणुकाही एकत्र लढवल्या जातील. पण जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात तसं काँग्रेस स्वबळावर लढली तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जातील.”
”लहान तोंडी मोठा घास” घेत सरनाईकांचा लेटरबॉम्ब, वाचा ५ महत्वाचे मुद्दे
ADVERTISEMENT
जाणून घ्या प्रताप सरनाईकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर काय काय आरोप केलेत?
ADVERTISEMENT
“एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं त्या लोकांना वाटत आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष स्वबळाची भाषा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत.”
“गेल्या दीड वर्षात आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची काम झटपट होतात पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची काम होतं नाहीत अशी नाराजी आमदारांमध्ये आहे. एका विशिष्ठ परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. परंतू भाजपशी युती मोडून शिवसेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठं करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली का अशीही चर्चा आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT