माझेच पाय धरणारे मला शिकवायला लागले, पवारांवर बोलायला लागले; खडसेंचा फडणवीसांना टोला
माझेच पाय धरणारे मला शिकवायला लागले आणि पवारांवर बोलायला लागले असं म्हणत जळगावात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही दोघंही इतके साधेभोळे राहू नका. दिलीप वळसे पाटील तुम्ही एखादा हिसका दाखवायला हवा होता म्हणजे इतकं सगळं करण्याची […]
ADVERTISEMENT
माझेच पाय धरणारे मला शिकवायला लागले आणि पवारांवर बोलायला लागले असं म्हणत जळगावात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही दोघंही इतके साधेभोळे राहू नका.
ADVERTISEMENT
दिलीप वळसे पाटील तुम्ही एखादा हिसका दाखवायला हवा होता म्हणजे इतकं सगळं करण्याची हिंमतच झाली नसती असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जळगावातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे वाचलं का?
केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचं तोंड दाबण्याचं काम केलं जातं. मी माझ्या एका भाषणात फक्त सूचना केली होती की डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं, खतांचे दर वाढले असं मी आमच्या मागच्या काही भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना ते जिव्हारी लागलं. इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी तो कसला मोर्चा होता तो सोडून दिला आणि नाथाभाऊ कसा आहे हेच भाषण करायला लागले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी होतो हे तर खरंच आहे ना? तिथपर्यंत जायला क्षमता लागते, ताकद लागते, कार्यकर्त्यांचं बळ लागतं. नाथाभाऊमध्ये ते होतं म्हणून मी शर्यतीत होतो. जनतेने चाळीस वर्षे आम्हाला निवडून दिलं. मात्र माझेच पाय धरणारे आज मला शिकवत आहेत. शरद पवारांवर बोलत आहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
‘मी टरबुजा म्हणणार नाही पण……’ एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका
ADVERTISEMENT
आपल्या भाषणात पुढे खडसे म्हणाले, अनिल देशमुखांच्या घरावर १०० धाडी पडले. १०० धाडींमध्ये काय समोर आलं? इथे बसलेल्या सगळ्यांना मी सांगतोय द्वेषाचं राजकारण कधी करू नका. मात्र जे चुकले आहेत त्यांना जागा दाखवा. यांचीही प्रकरणं निघतीलच की दिलीप वळसे पाटील तुम्ही एखादा हिसका वर्षभरापूर्वीच एक दोघांना दाखवायला हवा होता. ही सगळी वेळच आली नसती असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
एकनाथ खडसे म्हणाले की, काहीतरी करून मला अडकवण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे’ असं खडसे म्हणाले. सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही ते म्हणाले. चांगलं काम कसं असतं हे बारामतीला गेल्यावर पाहायला मिळतं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सर्वच पक्षातून प्रेम करणारे लोक आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व मी मान्य केले आहे. कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यावा हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असं ते म्हणाले.
खडसे म्हणाले की, दोन वर्षपूर्वी मी पुन्हा येणार असे फडणवीस म्हणत होते. पवार यांची खिल्ली उडवत होते. मात्र शरद पवार यांनी एका रात्रीत चित्र बदलले. हे फक्त शरद पवारच साध्य करू शकतात असंही खडसे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT