विरोधकांना आत्मपरिक्षणाची गरज, मोदींवर टीका करताना ‘या’ साठी कौतुकही व्हायला हवं- माजीद मेमन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनै दैदीप्यमान यश मिळवलं आहे. पंजाबचा अपवाद वगळता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चारही राज्यांमध्ये जनतेने पुन्हा एकदा भाजपला पसंती दर्शवली आहे. भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधकांनी या निवडणुकीत भरपूर प्रयत्न केले. परंतू या प्रयत्नांना यश आलं नाही.

ADVERTISEMENT

एकीकडे विरोधक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात मोर्चेबांधणी करत असताना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेनन यांनी नरेंद्र मोदींची स्तुती करताना विरोधकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

भाजपला खरोखरच महिला मतदारांमुळे ऐतिहासिक विजय मिळाला?

हे वाचलं का?

वारंवार संविधानाचं उल्लंघन, लोकांमध्ये द्वेष निर्माण करुन समाजात दोन गट तयार करुनही नरेंद्र मोदी कसे जिंकत आहेत? सुरुवातीला विरोधकांनी मोदींच्या विजयात ईव्हीएम मध्ये छेडछाड होत असल्याचं सांगितलं. परंतू आता या मुद्द्यालाही काही आधार राहिलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, विरोधकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतरही ते या सरकारला हटवू शकले नाहीत.

नरेंद्र मोदींचं वक्तृत्व हे कमालीचं आहे यात काही वाद नाही. ते दिवसाचे २० तास काम करतात. त्यांच्यावर टीका करताना त्यांच्यातील या गुणांचं कौतुकही व्हायलाच हवं, असं मेनन म्हणाले.

ADVERTISEMENT

विरोधकांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. नरेंद्र मोदींना भारतातच नाही तर जगभरातही मान्यता मिळते आहे या गोष्टीचा विचार व्हायला हवा. त्यांच्यात असे काही गुण असतील जे विरोधकांना अद्याप लक्षात आलेले नसल्याचं मेनन यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांशी बोलत असताना नरेंद्र मोदींनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आता निश्चीत झाल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे मेनन यांच्या या विधानाचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपने उत्तर प्रदेश जिंकलं, मोदी म्हणतात तसं २०२४ लोकसभेचे निकाल निश्चीत झालेत का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT