महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या Lockdown च्या दिशेने ? मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने येत्या रविवारपासून महाराष्ट्रात जमावबंदीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची वाटचाल दुसऱ्या दिशेने होते आहे का ? असेच संकेत या वक्तव्यातून होत आहेत. लॉकडाऊन लावण्याची मुळीच इच्छा नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पण वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढते आहे. गुरुवारी दिवसभरात ३५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर गेल्या आठवड्याभरातही रूग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रविवारपासून महाराष्ट्रात जमावबंदीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत Corona चा कहर, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

हे वाचलं का?

कडक निर्बंधांचे संकेत

जनतेने कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने येत्या काही दिवसांमध्ये अधिक कठोर निर्बंध लावावे लागतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू मात्र डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार? हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणू आणि औषोध उपचारांची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे

कोव्हिड रुग्णांच्या उपचारांसाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची  अग्नी सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पिटल्समधील सोयी-सुविधा, ऑक्सिजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी.  व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यू व ऑक्सिजन बेडस ची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला ५० हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टिंगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT