न्यूयॉर्कमधल्या इमारतीला भीषण आग, 9 लहान मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू
न्यूयॉर्कमधल्या ब्राँक्स भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 19 जणांचा मृत्यू झाला. या 19 जणांमध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचाही तपास केला जातो आहे. न्ययॉर्कमधील सर्वात मोठ्या घटनांपैकी ही एक घटना मानली जाते आहे. या घटनेत 50 हून […]
ADVERTISEMENT
न्यूयॉर्कमधल्या ब्राँक्स भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 19 जणांचा मृत्यू झाला. या 19 जणांमध्ये 9 लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचाही तपास केला जातो आहे. न्ययॉर्कमधील सर्वात मोठ्या घटनांपैकी ही एक घटना मानली जाते आहे. या घटनेत 50 हून जास्त लोक जखमी झाले आहेतय त्यांना रूग्णालयात दाख करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
आग नेमकी कशी लागली?
हे वाचलं का?
ही आग एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रविवारी सकाळी 11 च्या दरम्यान लागली होती. त्यानंतर ही आग आणखी पसरत गेली. त्यामुळे एकच खळबळ माजली. पाहता पाहता ही आग तिचे लोळ पसरत गेले. या घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 200 पथकं या ठिकाणी दाखल झाली होती. त्यांनी अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशनही सुरू करण्यात आलं. या घटनेत अनेक लोक आगीमध्ये होरपळले. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एका इलेक्ट्रिकच्या हिटरमध्ये बिघाड झाला आणि शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली आणि पुढे पसरत गेली अशी माहितीही आता समोर येते आहे. न्यूयॉर्क फायर डिपार्टमेंटचे आयुक्त डॅनियल निग्रो यांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले याआधी 1990 मध्ये हॅपी लँड सोशल क्लबमध्ये भीषण आग लागली होती त्यावेळी 87 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर न्यूयॉर्कमधली आगीची ही मोठी घटना मानली जाते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की फायर अलार्म वाजल्याने आमचं लक्ष इमारतीकडे गेलं. मात्र सुरूवातीला आम्हाला वाटलं की मॉक ड्रील आहे. मात्र फोनवर नोटिफिकेशन आल्यानंतर आम्ही नीट पाहिलं तेव्हा संपूर्ण इमारतीत धुराचे लोट दिसून येत होते. आगीचे लोळ आणि धुराचे लोट नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागले की इमारतीच्या खालीही जाणं आम्हाला कठीण वाटू लागलं होतं. आम्हाला बचाव पथकाने बाहेर काढलं असं या आगीत अडकलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.
ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली इमारतीत ही आग लागली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून आग पसरू लागली. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असं महापौरांनी सांगितलं. ही देशातील सर्वात वाईट घटनांपैकी एक आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT