अमरावती, यवतमाळमधील कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनबाबत मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रूग्णांची संख्या वाढते आहे. या वाढीची कारणं शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. या भागातील कोरोनाच्या जनुकीय रचनेत अर्थात स्ट्रेनमध्ये काही बदल झाला आहे कायाची पाहणी करण्यात आली. यामध्ये आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे. महाविद्यालयात तपासण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूंमध्ये ब्रिटन, दक्षिण अफ्रिका किंवा ब्राझिल या देशांमधले आढळलेल्या कोरोना विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ

हे पण वाचा- राज्यमंत्री बच्चू कडूंना पुन्हा कोरोनाची लागण

हे वाचलं का?

ही बातमी वाचलीत का? मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू

ADVERTISEMENT

पुण्यातील 12 नमुनेही या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले आहेत. त्यामध्येही जनुकिय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. या अनुंषगानेही आणखीही तपासणी सुरू आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणीही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यासंदर्भातला अहवाल पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

…. तर लोकांना किंमत मोजावी लागेल-अजित पवार

राज्यात कोरोनामुळे काही जिल्ह्यांबाबत आम्ही गुरूवारी निर्णय घेतले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, जयंत पाटील यांच्यासह काही मंत्र्यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना फोफावत असताना काही नागरिक निष्काळजीपणा दाखवत आहेत, हे असंच सुरू राहिलं तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. लोकांनी काळजी घ्यावी नाहीतर कठोर धोरण अवलंबवावं लागेल असंही अजित दादांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT