Pune Crime : तडीपार गुंडाची दादागिरी, घरात शिरुन २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग

मुंबई तक

वडगाव शेरी मध्ये काही दिवसांपूर्वी एका माथेफिरु तरुणाने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तडीपार गुंडाने २१ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन तिचा विनंयभंग केला आहे. इतकच नव्हे तर या तरुणाने पीडित मुलीच्या आईला शिवीगाळ करत धमकी दिली आहे. या धक्कादायक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वडगाव शेरी मध्ये काही दिवसांपूर्वी एका माथेफिरु तरुणाने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तडीपार गुंडाने २१ वर्षीय तरुणीच्या घरात शिरुन तिचा विनंयभंग केला आहे. इतकच नव्हे तर या तरुणाने पीडित मुलीच्या आईला शिवीगाळ करत धमकी दिली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुंड मोहसीन शेखविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मोहसनी शेख हा पोलीस रेकॉर्डवरचा गुंड असून तो नवी खडकी परिसरात जिजामाता नगरचा राहणारा आहे. अन्य एका गुन्ह्यात पोलिसांनी मोहसीन शेखवर तडीपारीची कारवाई केली आहे.

असं असतानाही मोहसीन शेखने कायदा मोडत पुणे शहरात प्रवेश केला. पीडित तरुणीच्या घरी गेल्यानंतर आरोपी मोहसीनने सर्वात आधी दरवाजा ठोठावला. यावेळी पीडितेच्या आईनं घराचा दरवाजा उघडला असता, त्याने आतमध्ये बळजबरीनं प्रवेश केला. तसेच ‘मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय’ अशी मागणीही केली. आईने यासाठी नकार दिल्यानंतर मोहसीनने तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

सातारा : न्यायाधीशाच्या भावावर प्राणघातक हल्ला; एक डोळा निकामी, एकाला अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp