उपचारांअभावी वृद्धाला डालग्यातच सोडावा लागला जीव, महाबळेश्वर तालुक्यातील दुर्दैवी घटना
एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर ग्रामीण पातळीवरील आरोग्य व्यवस्था पुन्हा उभी करण्यात स्थानिक प्रशासनाने केलेली दिरंगाई एका व्यक्तीच्या जीवावर उठली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात एका वृद्ध व्यक्तीला उपचारांअभावी डालग्यात (पाठीवरुन वाहून नेण्याचं साधन) आपले प्राण सोडावे लागले आहेत. २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीनंतर खरोशी गावाचा संपर्क तुटला होता. यानंतर गावातला रस्ता पूर्ववत करण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलं. […]
ADVERTISEMENT
एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर ग्रामीण पातळीवरील आरोग्य व्यवस्था पुन्हा उभी करण्यात स्थानिक प्रशासनाने केलेली दिरंगाई एका व्यक्तीच्या जीवावर उठली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात एका वृद्ध व्यक्तीला उपचारांअभावी डालग्यात (पाठीवरुन वाहून नेण्याचं साधन) आपले प्राण सोडावे लागले आहेत.
ADVERTISEMENT
२२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीनंतर खरोशी गावाचा संपर्क तुटला होता. यानंतर गावातला रस्ता पूर्ववत करण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलं. ज्यामुळे वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटलपर्यंत पोहचवण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागली.
खरोशी गावात राहणारे रामचंद्र कदम हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी खरोशी गावातला चतुरबेटमार्गे महाबळेश्वरला जोडणारा रस्ता बंद आहे. भरीस भर म्हणून रेनोशी मार्गे कोट्रोशी पुलावरुन तापोळ्याला जाणारा रस्ताही दरड कोसळल्यामुळे बंद आहे. २२ तारखेला झालेल्या पावसानंतर खरोशी गावात रस्त्यांची दुरावस्था झाली, यानंतर या गावाचा संपर्कच तुटला आहे. अद्याप या गावात प्रशासनाचा एकही अधिकारी न आल्यामुळे गावात येण्या-जाण्यासाठीचा रस्ताच बंद असल्यामुळे स्थानिक गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे वाचलं का?
शुक्रवारी रामचंद्र कदम यांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. वय वर्ष ७५ असलेल्या कदम यांना दवाखान्यात नेण्यासाठी कोणताच रस्ता शिल्लक नव्हता. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे तपोळ्यावरुन स्पीडबोट मागवणं कोणाला जमलं नाही. अखेरीस रेनोशी गावावरुन कदम यांच्यासाठी लॉन्च मागवण्यात आली. परंतू या लॉन्चपर्यंच पोहचण्यासाठी कदम यांना डालग्यात बसवून घेऊन जात असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT