ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार, पैलवानाच्या हत्येप्रकरणात सुशील कुमारविरुद्ध FIR
राजधानी दिल्लीत छत्रसाल स्टेडीयममध्ये ५ मे रोजी पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत ५ पैलवान जखमी झाले. ज्यातील एका पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, या प्रकरणात पोलिसांनी FIR दाखल केला असून ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचं नावही या FIR मध्ये आहे. दिल्लीमधील मॉडल टाऊन पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशील कुमारच्या ठिकाणांवर दिल्ली […]
ADVERTISEMENT
राजधानी दिल्लीत छत्रसाल स्टेडीयममध्ये ५ मे रोजी पैलवानांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत ५ पैलवान जखमी झाले. ज्यातील एका पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, या प्रकरणात पोलिसांनी FIR दाखल केला असून ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचं नावही या FIR मध्ये आहे. दिल्लीमधील मॉडल टाऊन पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
सुशील कुमारच्या ठिकाणांवर दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली परंतू तो त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. दिल्ली NCR आणि शेजारील राज्यांमध्येही दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैलवानाच्या हत्येत सुशील कुमार सहभागी असल्याचे पुरावे त्यांच्याजवळ आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी सुशील कुमारचे सासरे सतपाल सिंग आणि अन्य व्यक्तींची चौकशी केली आहे. परंतू या प्रकरणात आपलं नाव आल्याचं कळताच सुशील कुमार भूमिगत झाल्याचं बोललं जातंय. दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी छत्रसाल स्टेडीयममध्ये झालेली हाणामारी ही प्रॉपर्टीच्या वादातून झाली होती. या हाणामारीत ५ पैलवान जखमी झाले होते, त्यातील एका पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सुशील कुमारचा शोध पोलीस अधिकारी घेत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT