महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला. या आरोपांचं अनिल देशमुख यांनी खंडन केलं असलं तरीही माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपांनंतर विरोधी पक्षातील भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परमबीर सिंग यांच्या […]
ADVERTISEMENT
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला. या आरोपांचं अनिल देशमुख यांनी खंडन केलं असलं तरीही माजी पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपांनंतर विरोधी पक्षातील भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख राजीनामा देणार का??
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.
हे वाचलं का?
‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत, देशमुखांनी वाझेंना वसुलीचं काम दिलं होतं का? असा सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT
अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिलं होतं का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावं तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. @BJP4Maharashtra #ParambirSinghLetter
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021
ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होतं?
खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. @BJP4Maharashtra#ParamBirsinghLetter pic.twitter.com/e4v6JAIrXV— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 20, 2021
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही राजकारणातील गुन्हेगारीकरणाचा मुद्दा मांडत राज्य संकटात असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
राजकारणातील गुन्हेगारीकरण हा विषय परत ऐरणीवर आला की काय हे आताच्या गृह विभाग, पोलिस प्रशासन व सरकारच्या कारभाराकडे पाहून वाटत आहे. राज्य संकटात आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 20, 2021
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर काही दिवसांनी महाविकास आघाडी सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती. NIA ने CIU च्या कार्यालयात छापा मारल्यानंतर त्या आवारात काही महत्वाचे पुरावे व एक मर्सिडीज गाडी सापडली होती. ज्यात ५ लाख रुपये, पैसे मोजण्याची मशिन व इतर पुरावे सापडले होते. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारातच हा प्रकार घडल्यामुळे राज्य सरकार परमबीर सिंग यांच्यावर नाराज होत, ज्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्यात आलं.
ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT