आमचं सरकार आलं अन् जगावर कोरोनाचं संकट आलं, पण…: अजित पवार
मुंबई: राज्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प आज (11 मार्च) सादर केला. यानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. गेल्या दोन वर्षात कोरोनाने मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता आली नाही. मात्र, आता सगळं स्थिरस्थावर झाल्याने शेतकऱ्यांना जो अनुदानाचा शब्द महाविकास आघाडीने दिला होता तो आपण पूर्ण […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प आज (11 मार्च) सादर केला. यानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली. गेल्या दोन वर्षात कोरोनाने मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता आली नाही. मात्र, आता सगळं स्थिरस्थावर झाल्याने शेतकऱ्यांना जो अनुदानाचा शब्द महाविकास आघाडीने दिला होता तो आपण पूर्ण करत असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, आमचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर जगावरच कोरोना आला. त्यानंतर दोन वर्ष सगळ्यांचीच अडचणीची गेली. जगातील अर्थव्यवस्थेला देखील अडचण आली, तरी देखील आमच्या सरकारने सर्व घटकांना मदत करण्याचा प्रयत्न केला.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.
पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की, आमचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर जगावरच कोरोना आला. त्यानंतर दोन वर्ष सगळ्यांचीच अडचणीची गेली. जगातील अर्थव्यवस्थेला देखील अडचण आली, देशाच्या आली आणि देशातील जेवढी राज्यं आहेत त्या सगळ्यांनाच अडचणी आल्या.’
‘तरी देखील केंद्र सरकारने जे नियम घालून दिले होते की, एकंदरीत तुमच्या जीडीपीच्या साधारण किती टक्के कर्ज तुम्ही उचलू शकता त्याचा जर विचार केला तर त्यात आपण तीन टक्क्यामध्येच त्या गोष्टी ठेवल्या आहेत. वास्तविक त्यांनी साडेतीन टक्क्यांची मुभा दिली होती.’
ADVERTISEMENT
‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जे राज्य आहे त्यातील सर्व घटकांच्या कामाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे आपला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेकदा शेतकरी आम्हाला विचारायचे किंवा पाठीमागे मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान जाहीर केलेले होते ते का देत नाही?’
ADVERTISEMENT
‘मी मागेही तुम्हा सगळ्यांना सांगितलेलं होतं की, आम्ही केव्हा देऊ की ज्यावेळी आपली परिस्थिती पूर्वपदावर येईल तेव्हा नक्की देऊ. यावेळेस आम्ही तो 50 हजार रुपये 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जवळपास 10 हजार कोटी रुपये या सगळ्या शेतकऱ्यांकरिता मदत करणार आहोत. तसेच वर्षानुवर्षे भूविकास बँकेचा प्रश्न होता. तिथे देखील आमच्या सरकारने जवळजवळ 964 कोटींची कर्जमाफी दिली आहे.’
Maharashtra Budget 2022-23: बजेटच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी केली अत्यंत मोठी घोषणा!
‘शेतकऱ्यांनी तयार केलेला जो माल असतो तो मार्केट कमिटीमध्ये जात असताना तिथे देखील आम्ही साधारण 306 बाजार समितींकरिता जे काही सुविधा देतील कर्ज काढून त्याचं व्याज राज्य सरकार भरणार आहे. दहा हजार कोटींची गुंतवणूक त्यात होईल. दुसरं म्हणजे आम्ही शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत अजित पवार यांनी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT