MLA च्या गाडीने अनेक लोकांना चिरडलं, जमावाने आमदाराला चोप-चोप चोपलं; अपघातात 23 जण जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बनपूर (ओडिशा): ओडिशाच्या चिलिका विधानसभा मतदारसंघातील बिजू जनता दलाचे (BJD) निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांनी निवडणुकीसाठी जमलेल्या गर्दीला त्यांच्या वाहनातून पायदळी तुडवले. या अपघातात सुमारे 23 जण जखमी झाले असून यामध्ये कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलिसासह 7 पोलिस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या अपघातानंतर संतप्त लोकांनी आमदारांच्या वाहनाची पूर्ण तोडफोड केली. एवढंच नाही तर आमदारालाही जबरदस्त चोप देण्यात आला. ज्यामध्ये आमदार देखील गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

तैनात असलेल्या 7 पोलिसांसह 23 जण जखमी

खुर्दा जिल्ह्यातील बनपूर ब्लॉकमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसह सुमारे 500 ते 600 लोक जमले होते. त्याचवेळी निलंबित आमदार जगदेव हे तिथे पोहोचले आणि जमावाला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ड्युटीवर असलेल्या 7 पोलिसांसह 23 जण जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

संतप्त जमावाकडून आमदाराला चोप

या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या संतप्त नागरिकांनी आमदारांच्या वाहनाची तोडफोड केली. याच सगळ्या गदारोळात काही लोकांनी आमदाराला गाडीच्या बाहेर काढून तुफान चोप दिला. आमदाराला एवढी मारहाण करण्यात आली की, तो अक्षरश: रक्तबंबाळ झाला. दरम्यान, जखमी आमदारासह इतर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

अन्य राजकीय पक्षांचे सुमारे 15 समर्थकही जखमी झाले.

ADVERTISEMENT

मीडियाशी बोलताना खुर्दा जिल्ह्याचे एसपी आलेख चंद्र पाढी म्हणाले की, या अपघातात बनपूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह 7 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. यासह विविध राजकीय पक्षांचे सुमारे 15 समर्थकही या घटनेत जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेनंतर लोकांनी आमदाराला बेदम मारहाण केली आहे. सुरुवातीला आमदाराला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना भुवनेश्वरमधील दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात आले.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे पोलिसांनाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येत असून जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही पोलीस यावेळी म्हणाले.

Lakhimpur Kheri violence : पोलिसांची गाडी जाळली; उत्तर प्रदेशात संतापाचा उडाला भडका

सस्मित पात्रा यांनी केला घटनेचा निषेध

या घटनेचा निषेध करताना बीजेडीचे राज्यसभा खासदार सस्मित पात्रा म्हणाले की, ‘बानपूर ब्लॉकमध्ये आमदार प्रशांत जगदेव यांनी केलेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. हा प्रकार निंदनीय आणि दुर्दैवी आहे. या घटनेवर पोलीस प्रशासन दोषींवर कडक कारवाई करणार आहे. त्यांच्या अशाच प्रकारच्या वागण्यामुळे आमदार जगदेव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. जखमी झालेले निष्पाप लोकं लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.’

2021 मध्ये भाजपचे बळूगाव शहर अध्यक्ष निरंजन सेठी यांच्यावर हल्ला केल्यानंतर बीजेडी सरकारने आमदार जगदेव यांना पक्षातून निलंबित केले होते. भाजप नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदाराला तुरुंगातही जावे लागले होते. आता याच्याही पुढे जाऊन आमदाराने चक्क काही लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आमदार जगदेव यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT