सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; 256 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर पाठवले भारतात
राज्यात एकीकडे कोरोनाच्या रूग्णसंख्या वाढतेय तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात बेड्स तसंच ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. भारतातील ऑक्सिजनची कमतरता पाहता सिंगापूरने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार आज सिंगापूरहून 256 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन थेरपीसाठी सर्वात जास्त ज्या उपकरणांना मागणी आहे त्यापैकी ऑक्सिजन […]
ADVERTISEMENT
राज्यात एकीकडे कोरोनाच्या रूग्णसंख्या वाढतेय तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात बेड्स तसंच ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. भारतातील ऑक्सिजनची कमतरता पाहता सिंगापूरने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार आज सिंगापूरहून 256 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात दाखल करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आणि ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्यानंतर ऑक्सिजन थेरपीसाठी सर्वात जास्त ज्या उपकरणांना मागणी आहे त्यापैकी ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक आहे. विशेषत: रुग्णाला घरात आयसोलेशन दरम्यान आणि रुग्णालयात ऑक्सिजनची कमरता असल्यास हे कन्सन्ट्रेटर सर्वात जास्त उपयोगी ठरतं.
हे वाचलं का?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूरहून 256 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आलेत. ज्यांचं वजन जवळपास 5510 किलो इतकं आहे.
सिंगापूर एअरलाइन्समार्गे हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर भारतात आणण्यात आले. यामध्ये पहिलं शिपमेंट 27 एप्रिल रोजी 21:52 वाजता मुंबईत दाखल झाली आणि दुसरं 28 एप्रिलला 10:10 वाजता पोहोचलं. यातील प्रत्येकामध्ये 128 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर होते.
ADVERTISEMENT
Oxygen concentrator: ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर नेमकं आहे तरी काय… त्याची एवढी मागणी का?
ADVERTISEMENT
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सध्याच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाचं संपूर्ण पथक जीवनावश्यक वस्तूंची उभारणी आणि पुरवठा करण्याची अविरतपणे काम करतायत. एअर कार्गो अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जगभरातील आवश्यक वैद्यकीय वस्तूंच्या वाहतुकीचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनुभव आहे.
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर म्हणजे नेमकं काय?
ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एखाद्या कॉम्प्युटरच्या मॉनिटर स्क्रिनपेक्षा थोडा मोठा आहे. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे एक पोर्टेबल मशीन आहे. ज्याच्या मदतीने रुग्णांसाठी हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर प्रेशर स्वेंग ऑबर्झव्हेशन टेक्नोलॉजीच्या वापर करतं. ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हे अशा जागी वापरलं जातं जिथे द्रव (Liqud) ऑक्सिजन किंवा प्रेश्चरायईज्ड ऑक्सिजनचा वापर हा धोकादायक ठरु शकतो. ऑक्सिजनची कमतरता असल्यास मेडिकल ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरने रुग्णाला आपण ऑक्सिजन देऊ शकतो. या यंत्रातून एका नळीद्वारे ऑक्सिजनयुक्त हवा ही रुग्णापर्यंत पोहचवते. जी की, 90 ते 95 टक्के शुद्ध आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT