Pandharpur By Election : भाजपने जुळवलं बेरजेचं गणित, या फॅक्टरचा महाविकास आघाडीला फटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि भारत भालकेंचे पूत्र भागिरथ भालके यांना या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी ३७३३ मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर-मंगळवेढ्यात भाजपने आपलं कमळ फुलवण्यात यश मिळवलं.

ADVERTISEMENT

बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना ! ममतांचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना फडणवीसांचा टोला

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने केलेलं बेरजेचं गणित जुळून आलं. पंढरपूर तालुक्यात परिचारक गटाची मोठी ताकद आहे. २०१९ च्या निवडणुकीत परिचारक यांना ७६ हजार ४२६ मत मिळाली होती. आवताडे यांची मंगळवेढा भागात ताकद आहे. भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करताना परिचारक गटाचा आवताडे यांना पाठींबा मिळेल याची खात्री घेतली. आवताडे यांना २०१९ मध्ये ५४ हजार १२४ मतं मिळाली होती. त्यामुळे भाजपने परिचारक आणि आवताडेंच्या मतांचं बेरजेचं गणित जुळवून आणत पंढरपूर-मंगळवेढ्यात बाजी मारली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार घोषित करण्यासाठी खूप कालावधी घेतला. पक्षातली अंतर्गत बंडाळी आणि भालकेंच्या नावाला काही जणांकडून होणारा विरोध मोडून काढत घडी बसवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा बराच कालावधी गेला. ज्याचा फायदा भाजपने घेतला.

हे वाचलं का?

आवताडे यांच्या ताब्यात अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि ग्रामपंचायती आहेत. याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून येत आहे. मतमोजणीत पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आवताडे आणि भालके यांच्यात काटे की टक्कर सुरु होती. परंतू यानंतर समाधान आवताडे यांनी आपली आघाडी कायम ठेवत निवडणूकीत बाजी मारली.

या निवडणूकीत दोन्ही उमेदवारांना बंडखोरांमुळे चांगलीच डोकेदुखी झाली होती. आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे, शिवसेनेच्या पदाधिकारी शैला गोडसे, राजु शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. परंतू या उमेदवारांना फारशी मतं मिळाली नाहीत. परंतू राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने योग्य रणनिती आखून महाविकास आघाडीच्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करत आपली संख्या १०६ वर पोहचवली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT