पंढरपूरचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला, भारतात सुखरूप परत आणण्यासाठी करणार प्रयत्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युक्रेनमधल्या वैद्यकीय महाविद्यालयांत अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . यामध्ये पंढरपूर येथील प्रसाद शिंदे – नाईक हा मुलगा बुकवेनिक स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एम.बी.बी.एस. च्या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेला होता. परंतु रशियाने युक्रेनच्या राजधानीच्या विमानतळावर हल्ला केल्याने विमानसेवा रद्द झाली असल्याने मुलांना युनिव्हर्सिटीकडे परत बोलावण्यात आले आहे . या पथकाबरोबर भारतातील 80 विद्यार्थी असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे .

ADVERTISEMENT

दरम्यान भाऊसाहेब शिंदे – नाईक यांनी मुलगा प्रसादशी गुरुवारी रात्री सात-आठच्या दरम्यान मोबाईलवरून संपर्क केला . त्याने मी सुखरुप आहे . आम्ही पुन्हा विद्यापीठाकडे चाललो आहोत , दोन दिवसात परिस्थिती निवळल्यानंतर आम्ही भारतात परत येऊ असं सांगितलं . शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्याशी संपर्क साधला आहे . नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचेही भारताने नमूद केले आहे .

रशिया युक्रेन युद्धानंतर जळगावात वाढला सोन्याचा भाव, प्रति तोळा 51 हजारांच्याही पुढे

हे वाचलं का?

आवश्यकता भासल्यास सर्व भारतीयांना भारतात परत घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे . त्यामुळे भारतीय सरकारने नागरिकांना तात्पुरता देश सोडावा लागणार , असा सल्ला युक्रेनमधल्या भारतीयांना गेल्या काही दिवसांमध्ये दिला होता . ऑनलाईन अभ्यासक्रम घ्यावा , अशी विनंती विद्यार्थ्यांच्या वतीने भारत सरकारने विद्यापीठांना केली होती .

दरम्यान पंढरपूर आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणार असल्याचे आ . समाधान आवताडे , माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले .

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रशियाने गुरूवारी रणशिंग फुंकत युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत 100 हून अधिक जणांचा जीव गेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. युक्रेनमधील हिंसा थांबवावी असं आवाहन मोदी यांनी पुतिन यांना केलं. एवढंच नाही तर रशियाने धोरणात्मक चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असंही त्यांनी सुचवलं आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी तेथील भारतीय दुतावासाने गुरुवारी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लष्करी कायदा लागू झाल्याने तिथे वाहतुकीत अडथळे येत असल्याने घरीच थांबण्याचे आवाहन दुतावासाने भारतीयांना केले. आपल्याला मायदेशी परत पाठविण्यासाठी दूतावासाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तोपर्यंत घरातच थांबा, तसेच जवळच्या बॉम्बरोधक शिबिरांमध्ये आसरा घ्या, अशी सूचना राजदुतांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT